टॅप कँप एक विलक्षण अनुभव - शेवटचा भाग

शेवटचा भाग यायला खूप उशीर झाला त्याबद्द्ल दिलगिरी.
माझ्या कामाचं स्वरुप तुम्हा बहुतेकांना माहिती आहेच. पण त्यातूनही सांगते 'प्रत्येक शाळेचं रेटींग हे अकांऊंटेबीलिटी वर असतं. टेक्सासमधे स्टार टेस्ट वर. त्यामुळे सध्या शारिरीक आणि मानसिक कष्ट सुरु आहेत. मी एकटी फिफ्थ ग्रेडचा किल्ला लढवते आहे. वर्षभर ह्या ग्रेडच्या टिचर्सनी मला प्रचंड पुशबॅक दिला आहे. एकही दिवस ट्यूटरींग केलेलं नाही. मी वर्षभरात ७५ मुलांना रोज ट्यूटर केलं. पहिल्या राऊंडचे रिझल्ट्स उत्तम आले आहेत.आता ३१ फेल झालेल्या मुलांना मी एकटी रोज दोन तास आफ्टर स्कूल ट्यूटर करते आहे.एकाही टिचरने कमीट केलेलं नाही वारंवार नोटीस देऊन सुध्दा.सेकंड राऊंड टेस्टींगमधे फिफ्थच्या मुलांना सेकंड अटेम्ट देता येतो.माझा प्रिन्सिपॉल चांगला आहे पण टीचर्सना कंन्फ्रंट करत नाही.ह्या टिचर्सनी मुलांसाठी काहीही केलेलं नाही. अख्खी टीम आजिबात डेडीकेटेड नाहिये. मला मुलांना हेल्प केल्याशिवाय राहवत नाही.मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या ओढून नेते आहे.केवळ या मुलांसाठी. ह्या सगळ्या तंत्रात घरी आले तेही उशीरा तर माझा वेळ मी पूर्ण लेकिला आणि नवर्‍याला देते.मागच्याच आठवड्यात लेक मी येईपर्यंत झोपून गेली होती. आणि ती उठायच्या आधी मला मिटींगसाठी जावं लागलं. त्या दिवशी तिचा संध्याकाळी फोन आला' आई आय हॅवंट सीन यू इन ४० आवर्स'. त्या दिवशी माझा कस लागला.आता ह्या आठवड्यात परत रोज दोन तास ट्यूटरींग करते आहेच आणि बुधवारी सासू- सासरे येत आहेत.हे सांगते आहे कारण मला इच्छा असूनही अक्षरश: वेळ मिळत नाहिये.आणि लिहितेय तेव्हा मला शक्य आहे तितक्या डिटेल्समधे लिहिते आहे.
मी माझ्या परीने आठवून लिहिते आता शेवटचा भाग.
पॅरेंट नाईटला जवळजवळ १०० लोक आले होते.माझ्या आधी असिस्टंट सुपरिटेंडंटचं स्पीच झालं. तिने खूप सुरेख शब्दात हा कँप कशासाठी आहे त्याचं वर्णन केलं. मुलांना घरी कसं ट्रीट करावं, मुलांशी संवाद कसा सुरु ठेवावा आणि कठीण काळातही कसं मॅनेज करावं ह्याचा फार छान सल्ला दिला.
शी इज वन अमेंझींग लेडी. माझ्या स्पीचमधे मी हा कँप कसा आहे, माझा अनुभव कसा वाटतोय आणि मी काय करते हे थोडक्यात सांगितलं. मुलांच्या टेस्टिमोनीज वाचल्या तेव्हा मात्र पॅरेंट्सच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खूप छान संवाद साधता आला मला नंतर पेरेंटसोबत. त्या संध्याकाळी १०० पुस्तकं डोनेट केली गेली. शिवाय प्रत्येक फॅमिलीला केअर पॅकेज देण्यात आलं. त्यात ब्रश, टूथपेस्ट, बॉडी वॉश, सॅनिटरी नॅपकिन्स, डिओडरंट्स, हेअर कटींग कुपन्स, ग्रोसरी गिफ्ट कार्ड्स इ. बर्‍याच अत्यंत उपयोगी गोष्टी देण्यात आल्या.स्टुडंट सर्विसेस डिपार्टमेंटला हॅट्स ऑफ सगळ्या प्लॅनींगसाठी.
आज शेवटचा दिवस होता कँपचा. आज मुलं बसमधून उतरुन सराईतपणे कॅफेटेरियात गेले. आज आय हॉप या रेस्टॉरंटने मुलांना पॅनकेक, सॉसेजेस आणि हॅशब्राऊन असा भरगच्च ब्रेकफास्ट डोनेट केला होता.ब्रेकफास्ट नंतर मुलांना परत प्रायझेस मिळाली. मुलं जाम खुश होती. मग आम्ही सोशल ट्रेनींगला मुलांना घेऊन गेलो. कँपच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन तासात मुलांना ग्रुप परफॉर्मन्स करायचं असतं. आज क्रिसने मुलांना खूप छानरीत्या समजावून सांगितलं 'ग्रुप परफॉर्मन्स कसा करावा, फ्रस्ट्रेशन कसं हँडल करावं'. आम्ही मुलांनाच विचारलं तुम्हाला काय करायचंय? त्यांना डिस्कस करायला थोडा वेळ दिला. आणि डिस्कशनसाठी मधे जागा ठेवून कॉन्फरंस स्टाईल टेबल्स लावली. आणि आम्ही रुमच्या कोपर्‍यात गेलो. मुलांना वॉईस लेवल किती असायला हवी ह्याचं बंधन घातलं आणि बॅड वर्ड्स अलाऊड नाहीत हेही समजावलं.ती वीस मिनिटं मुलांनी ज्या काही मॅच्युरिटीने हँडल केलीत की बस.खरंच कौतुक वाटलं.शेवटी त्यांनी ठरवलं की ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी करावं.बाकीच्यांनी सपोर्ट करावं. त्यांनी पोएम्स लिहायच्या ठरवल्या टॅप कँपविषयी. पंधरा मुलं तयार झाली.आता त्यांना शांतता हवी होती.आम्ही त्यांना पेपर आणि पेन्सील दिल्या आणि २५ मिनिटं दिली.
क्रिसने रिलॅक्सींग म्युझीक लावलं आणि मुलं लिहायला लागली. काही मिनिटातच हळूहळू सगळ्यांनाच लिहायचं होतं. :) जसजशा पोएम्स होत होत्या तसं ते आम्हाला वाचून दाखवत होते.फार सुरेख लिहिलं ह्या मुलांनी. टॅप कँपचे कितीतरी अर्थ त्यांनी आम्हाला नकळत समजावले.
आता मॅथ क्लासची वेळ झाली होती. मी आदल्या दिवशीच भिंतींवर प्रॉब्लेम्स चिकटवले होते.सर्कीट तयार केलं होतं.म्हणजे मुलांनी एक प्रॉब्लेम सोडवायचा आणि त्याचं उत्तर दुसर्‍या एका प्रॉब्लेमच्या पेपरवर सगळ्यात वरती असतं. ज्या पेपरवर उत्तर सापडलं त्या पानावरचा प्रॉब्लेम सोडवायचा.ह्या मुलांच्या लेवलप्रमाणे प्रॉब्लेम क्रिएट केले होते. मुलांना स्नॅक खाता खाता ग्रुपमधे फिरत फिरत गणीतं सोडवायची आयडिया जाम आवडली. आम्ही फिरुन मॉनीटर करत होतो आणि मुलं रेंगाळली तर त्यांना मदत करत होतो.मुलांना खूप मजा आली.
लंचला चिकन क्रिस्पर्स, केक आणि ज्यूस होता. मुलं काय आनंदात खात होती. टीचर्सना आज सँडविच मागवले होते.मुलांचा आरडाओरडा सुरु होता. आमचं लंच होतेय तोवर क्रिसने जोरात अनाऊन्स केलं 'हे कीड्स डू यु वाँट टू सी युअर टीचर्स डान्स ?'कॅफेटेरिया अक्षरश: दणाणून गेला. आणि आम्हाला उठवलं गेलें.आम्ही पंधरा मिनिटं नाचलो. :) आणि हुश्श करुन बसलो.आता मुलं उठली. एकेक मुलांच्या मुव्ह्स बघून आम्ही थक्क झालो. असा सगळा दंगा तासभर चालला.मग आम्ही मुलांना परत परफॉर्मन्सच्या तयारी साठी घेऊन गेलो. मुलांनीच सगळं प्लॅन केलं.आम्ही फक्त मदत केली. थोड्याच वेळात आम्हाला अनाऊन्स करुन खाली कॅफेटेरीयात बोलावलं.प्रत्येक ग्रेड लेवलने एक वेगळी कॉन्सेप्ट प्रेझेंट केली.आमच्या मुलांनी कमाल केली. आम्हाला सरप्राई़ज केलं. आम्ही दिलेल्या ग्लो स्टीक्स त्यांनी स्टेजवर नेल्या होत्या. आणि प्रत्येक पोएमच्या वेळी ते ग्लो स्टीक्स हवेत झुलवायचे. काय सुरेख दृश्य होतं ते. परफॉर्ममन्स वेगवेगळे असले तरी मेसेज एकच होता.' हाऊ मच थिस कँप मीन्स टू देम'.
काही परफॉर्मन्स आणि पोएम्स हेलावून टाकणार्‍या होत्या :dhakdhak: इतक्या कठीण परिस्थितील्या
आयुष्यातूनही त्यांनी आनंदाचा अर्थ उलगडून दाखवला होता.
आता एक मोठं सरप्राईज होतं. बेस्ट बायने दोन लॅपटॉप्स डोनेट केले होते त्यासाठी नावं पिक केली जाणार होती.एका थर्ड ग्रेडच्या मुलीला एक मिळाला. सुपरिटेंडंटने तिच्या आईला फोन केला. त्या आईचा आनंद जाणवत होता. दुसरा लॅपटॉप एका ८ वीतल्या मुलाला मिळाला. त्याच्याही आईला फोन केला गेला. ती आईतर नाचत असावी आम्हाला जाणवलं.ज्या मुलांना मिळालं नाही त्यांचा मोठेपणा परत दिसला.बाहेर पाहिलं तर बसेस आल्या होत्या. आता ह्या मुलांना घरी पाठवायची वेळ झाली होती.
बरीच मुलं आपल्या टीचर्सना हग करुन चुपचाप बसकडे जात होती.आता उरलेले तीन दिवस काय करायचं स्प्रिंग ब्रेकमधे हा प्रश्न पडला असेल का त्यांना ?
मुलांना निरोप देऊन आम्ही रुम्स क्लिन करुन निघालो.एकमेकांना हग्ज देऊन सगळेच निरोप घेत होते.
माझ्याही कित्येक ओळखी नवीन झाल्या होत्या. स्टुडंट सर्विसेसच्या सगळ्या टीमला थँक्स म्हणून मीही
निघाले. आज मला अस्वस्थता नव्हती. हा सगळा अनुभव मला समृध्द करुन गेला होता.कितीही कष्ट पडले तरी मुलांना सक्सेसफूल करायचं बळ मला मिळालं होतं.वरती लिहिलंय सध्या मी जे ओढून नेतेय त्याचं बळ मला ह्या कँपने दिलंय. कँपच्या सुरुवातीला मला एक प्र्श्न विचारला गेलात होता.' व्हॉट वुड यु डू मेक अ डिफरन्स इन वन चाईल्ड्स लाईफ'. ह्या कँपच्या आधी रोज एकदा ट्रबलमधे येणारा मॅथ्यू मला टॅप कँपमधे केलेलं प्रॉमीस आता रोज पाळत होता.स्कूलमधे परत आल्यावर माझ्या स्मॉल ग्रुपमधेच शिकणार असा एकमेव हट्ट त्याने केला. मी पण तो पुरवला. वेळ काढून त्याला रोज शिकवलं.गेल्या तीन वर्षात एकाही परिक्षेत पास न झालेला मॅथ्यू पहिल्याच अटेम्टमधे पास झाला तो केवळ स्वतःच्या मानसिक बळावर आणि सेल्फ मोटिवेशनमुळे. त्या कँपनंतर त्याच्या ट्र्बलमधे येण्याचं प्रमाण जवळजवळ शून्यावर आलंय. हेच ह्या टॅप कँपचं यश आहे.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle