ब्रोकन व्हीट पुडिंग ऊर्फ गव्हाची खीर विथ अ ट्विस्ट

साहित्य-
ब्रोकन व्हीट ऊर्फ गव्हाचा दलिया एक वाटी
दोन वाट्या दूध
साखर एक वाटी
व्हाईट चॉकलेटचे तुकडे एक वाटी
व्हॅनिला इसेन्स
चमचाभर तूप
(प्रयोगच केलेले असल्याने परफेक्ट प्रमाण नाही. शिवाय प्रत्येकाची गोडाची आवड वेगवेगळी असते.)
कृती-
चमचाभर तूप घालून दलिया त्यावर मस्त परतून घ्या. अडीचपट पाणी घालून शिजवून घ्या.
शिजलेल्या दालियात दूध घालून उकळायला ठेवा. उकळी आल्यावर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी व्हाईट चॉकलेटचे तुकडे घाला. चव बघून आवडीप्रमाणे अजून साखर आणि / किंवा चॉकलेटचे तुकडे घाला. हव्या त्या कन्सिस्टन्सीला आल्यावर गॅस बंद करा. इसेन्स घाला. गार झाल्यावर ही खीर जरा आळेल हे ध्यानात ठेवा.
खीर रूम टेंपरेचरला आली की ज्या ग्लास/वाटीत सर्व्ह करायचे आहे त्यात भरून थंड करायला ठेवा. वरून चॉकलेटचा चुरा/ सॉस किंवा फळांचे तुकडे घालून डेकोरेट करून सर्व्ह करा. ओरिओ बिस्कीट किंवा तत्सम प्रकारही चालू शकेल. तुमची कल्पकता पणाला लावा.
अधिक टिपा- १. शिजवतानाच यात परतलेल्या मखाण्याची पावडर किंवा तुपावर परतलेली लाल भोपळ्याची पेस्ट घालून खीर शिजवल्यास चव/रंग यांची व्हरायटी मिळेल. जास्त पौष्टिक खाऊ घातल्याचं पुण्य आणि समाधान मिळेल.
२. जितकं चॉकलेट घालाल तितकं पुडिंग क्रीमी होईल. आणि यम्मी लागेल.

माहितीचा स्रोत – भावजयीची आणि माझी आयडीया आणि माझे प्रयोग.

हा पदार्थ इतक्यात केलेला नसल्याने फोटो आहे का जुना ते शोधावं लागेल. किंवा परत करून फोटो टाकेन.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle