काल रात्री मी मल्टिपल व्हेज चीज पराठे केलेले. कांदा, टोमॅटो, बटाटे, मटार, मक्याचे दाणे, गाजर आणि चीज घालून.
मल्टिग्रेन आटा आणि रवा थोडे ताक आणि किंचित ओवा, मीठ टाकून दोन तीन तास भिजवून ठेवलं.
बटाटे सेपरेट उकडले, बाकी सर्व 2 min मावेत हाय पॉवरवर शिजवून घेतलं. मग सर्व मिक्स करून त्यात ठेचा कोथिंबीर, पा भा मसाला, थोडा गरम मसाला, मीठ, ओवा, जिरं, मीठ, तीळ घालून मिश्रण केलं त्यात चीज मिक्स केलं, एक मिनिट मावेत परत शिजवले सर्व. मग पोळीच्या अर्ध्या भागावर ते टाकून वर थोडी शेव पसरली आणि ते दुमडून बटरवर खरपूस भाजून घेतले. एक एका पोळीवर पसरून दुसरी पोळी ठेऊन केला. आलू पराठयासारखा सारण पारीत भरून लाटता नाही येणार मला हा.