रमझान निमित्याने असंचं मधुरा रेसिपीज वर बुलानी पराठा बघितला त्यात बदल करून मी पराठे केले रात्री, छान झालेले. हल्ली फेसबुकवर आपोआप वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडीओज येत असतात, मी कोणाला like केलेलं नाहीये. हेब्बर, मधुरा, तरला दलाल etc. कधीतरी बघते क्वचित त्यात बघितलेला पराठा.
मी बरेच बदल केले मात्र त्यात. माझ्याकडे जे उपलब्ध ते घालून केला. आपली कणिक ताक,ओवा
तीळ आणि मीठ घालून भिजवली,ती तीन तास ठेवली भिजवून. मग बटाटे उकडून घेतले, त्यात कांद्याची पात कच्ची चिरून घातली, अगदी बारीक वेलचीएवढा कांदा होता एका पातीत तोही घेतला, बाकी मोठे नाही घेतले. मग त्यात गरम मसाला थोडा, कांदा लसूण मसाला थोडा, तिखट, मीठ, सुंठ पूड, जिरं, हिंग, मिरपूड हे सर्व घालून सारण केलं. मग पराठा लाटून एका भागात सारण भरून दुसरा दुमडला. तव्यावर ठेऊन बटरवर खरपूस भाजला. सोबत लोणचं होतं मला, सॉस पण होता नवऱ्यासाठी.