शिवणाचे उद्योग

पोर्टेबल शिलाई मशीन काही वर्षे वापरतेय पण क्रोशे बॅग्ज च्या लायनींगसाठी आणि इतर किडुक मिडुक घरगुती कामासाठीच अजुन वापरत होते. क्रोशे बॅग्ज च्या लायनींग साठी एकेक नवीन नवीन ऍडीशन करत होते तेव्हा मात्र मनात यायचं की एखादी पुर्ण बॅग शिवून पहायचं पण मुहूर्त सापडत नव्हता. पण प्लॅस्टिक बंदीच्या निमित्ताने बाजारात आलेली भाजीची पिशवी पाहिली आणि म्हटलं पाहुचया जमते का. ट्रायल म्हणून जुन्या कपड्यांवरच प्रयोग करूया म्हटलं आणि जुने वापरात नसलेले कुर्ते होते त्यांनाच घेतलं हाताशी आणि बऱ्यापैकी मोठ्या साईज चे कप्पे असलेली जम्बो बॅग शिवली चुकत माकत. शिवणक्लास वगैरे केला नसल्याने शिवता शिवताच एकेक ट्रिक शिकत गेले. पुर्ण झालेली बॅग जवळच्या सर्वानाच आवडली आणि त्यांनी कौतुक ही केले त्यामुळे फारच उत्साह आला.
हि पहिली बॅगIMG-20180703-WA0062.jpg

IMG-20180703-WA0064.jpg

आता थोडा कॉन्फिडन्स आलेला म्हणून स्वतःसाठीच अजुन एक प्रयोग करूया म्हटलं. रोजच्या वापरासाठी एक हँडबॅग करायची ठरवली. जुना सिंथेटिक स्कार्फ होता त्याला सदगती दिली :ड आणि मागे 1 ,पुढे 2 पॉकेट्स असलेली आणि आतमध्ये बॉटल होल्डर, की होल्डर एक छोटा कप्पा आणि उभट पण फॅट बॉटम असलेली अशी आखुडशिंगी बहुदुधी टाईप बॅग शिवली Whew :ड . मशीन ला इतक्या कामाची सवय नसल्याने :winking: आणि करता करता एकेक सुचत होतं तसं ऍड करत गेल्याने वाढीव काम खुप झालं Lol फिनिशिंग अजुन आलं असतं पण सगळं एकातच करायच्या हट्टामुळे जरा गडबडलच :ड .

IMG-20180703-WA0058.jpg

PicsArt_07-03-08.23.44.jpg

पुन्हा सगळ्यानी हे ही अप्रीशिएट केल्याने हायस वाटलं आणि नेक्स्ट काय बरं करू या विचारात आहे. त्रुटी आहेत तरी गोड मानुन घ्या :ड

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle