गव्हाचा मलिदा

माझ्या आजोळी कुपवाडला आमच्या घराच्या समोर पिराची विहीर .. त्याच्या थोडंसं पुढे गेलं की दर्गा अाहे.. त्याच्यासमोर ग्रामपंचायत चावडी जिथे दर्ग्याचा उरुस , मोहरमला देवांच्या भेटीगाठी व्हायच्या .. दर उरुसाला मलिदा करायची पद्धत आमच्या घरी कशी सुरु झाली ते माहीत नाही .. पण दरवेळी आजोबा उरुसाचं निमंत्रण द्यायचे नंतर शाळेच्या गोंधळात जाणं व्हायचं नाही म्हणुन मलिदाचा डब्बा पोचवायचे.. हा मलिदा किमान ४-५ दिवस टिकतो , मला आवडतो ह्या कारणाने कधीही घरी होतो. रेसिपी तशी सोपी अन पटकन होणारी आहे .. आज्जीने सगळी मापं चवीनुसार ..हवं तेवढं अशी सांगितली आहेत

साहित्य -
खपली गहू - लालसर भाजून जरासं जाडसर दळून आणायचं.. थोडा रवा पडायला हवा.. सोजी सारखं,साधे गहू वापरता येतील
सुकं खोबरं - किसून घ्यायचं
गूळ - बारीक चिरुन घ्यायचं
खसखस - गरम करुन मिक्सरमधे थोडं बारीक करायचं
सुंठ मिरे किंवा वेलदोडे
थोडंसं जायफळ (नाही घेतलं तरी चालेल)

कृती -
1. जाडसर गव्हाच पीठ नीट चाळून घ्यायच, त्यात थंड पाणी घालून कणीक भिजवून घ्या. पाण्याऐवजी दूध वापरता येईल
2. जाडसर पोळी लाटून मंद आचेवर भाजून घ्या
3. पोळी थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करुन घ्या. हातानेही नीट चुरतां येतील. आवडीप्रमाणे टेक्शर बदला.
4. ह्या मिश्रणांच बारीक चिरलेला गूळ नीट मिक्स करुन घ्या. मिश्रण कोटेड गुळाचे बारीक गुठळ्या दिसायला हव्यात (नंतर ते डायरेक्ट वेचून उचलून खायला मजा येते )
5. आता ह्यात सुकं खोबरं , सुंठ मिरे / वेलदोडे , खसखस पूड घालून नीट मिक्स करुन घ्या.
6. सर्व्ह करताना वाटीभर मलिदा त्यावर घरचं साजूक तूप , आवडतं असेल तर कोमट दूध

हा मलिदा बाहेर ठेवायचा असेल तर पोळी ठेवायची दुरडी शिबडं - वेताची टोपली - त्यात तलम सुती कापड पसरुन त्यात ठेवायचं .. ४-५ दिवस आरामात टिकतो .. फ्रिजमधेही ठेवतां येतो

3FB8354F-91A8-447C-BA45-72B54C98AD06.jpeg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle