सध्या लो कार्ब काही मिळतय का असा शोध चालु असल्याने नवनवीन रेसिपी शोधत असते.. त्यात ही रेसिपी सापडली आ्णि आवडली.. आंतरजालावर ब-याच वेगवेगळ्या रेसिपीज आहेत.. त्यात माझ्या प्रमाणे काही बदल करुन ही केलेली रेसिपी
साहित्य
५ ६ अंडी
१ कांदा
४ ५ लसूण पाकळ्या
२ ढबु मिरच्या
५ ६ टोमॅटो
टोमॅटो सॉस १ २ चमचे
चिली फ्लेक्स १ चमचा
तिखट १ चमचा
मिक्स्ड हर्ब्स
ओरेगानो
चीज
मीठ
तेल
कृती
ही पाककृती पॅनमध्येच करावी.. कढईमध्ये होणार नाही..
कांदा, लसुण, ढबु मिरची, टोमॅटो नॉर्मल चिरुन घ्यावी. थोडं बारिकच चिरावं
तर एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालावे त्यात व्यवस्थित चिरलेला कांदा परतुन घ्यावा.. मग बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा.. मग चिरलेली ढबु मिरची परतुन घ्यावी.. सगळं मऊ झाल्यावर बारिक चिरलेला टोमॅटो त्यात घालावा.. आणि झाकण ठेऊन १५ मिनीटॆ शिजु द्यावा.. मधुन मधुन हलवावे.. टोमॅटोचे पाणी पूर्ण आटले पाहिजे.. आटल्यावर त्यात चिली फ्लेक्स, तिखट, हर्ब्स, मीठ, सॉस इ. घालुन पुन्हा परतावे आणि २ मिनीटे शिजुन द्यावे.. आता त्या मिश्रणामध्ये लाकडी उलतन्यानेच मधे मधे थोडी जागा करावी. आणि एका वाटीमध्ये एक एक अंड फोडुन त्या जागेत घालावे.. अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळाच राहु द्यावा.. त्यावर थोडं मीठ टाकावं अशी पाच सहा ठिकाणी अंडी टाकुन झाली की त्यावर अंदाजाने थोडं मीठ घालावं.. सगळ्या मिश्रणावर चीज किसुन घालावं.. आणि पुन्हा मंद आचेवर ५ मिनीटे शिजुन द्यावं.. अंडं छान शिजलं की खालचा आणि वरचा भाग एकजीव करु नये.. तो एकत्रचं असतो पण मिक्स न करता भाजी आणि अंडं एकत्र येईल असा सर्व करावा..
टीप -
- गरम गरम खावा..
- ब्रेड्बरोबर किंवा ब्रेड शिवाय सुद्धा खाता येतो.. ब्रेडबरोबर खायचा झाल्यास ब्रेड कुरकुरीत भाजावा..(ब्रेड असल्यास डिश लो कार्ब राहणार नाही :))..
- ढबु मिरची सोबत रेड आणि येलो बेल पेपर मश्रुम या गोष्टी पण घालता येतील..
- अंड्यावर मीठाबरोबर मीरपूड पण घालता येईल..
- सॉस टाळता येऊ शकेल..
- अजुन काही वेरिएशन्स सुचल्या की सांगा..
- टॆस्टी ,हेल्दी आणि पोटभरीची डिश होते..
आंतरजालावरुन साभार..