(भोपळ्याच्या बाकरभाजीवरून सुचलेली पराठ्याची कल्पना)
१/४ किलो (१/२ पाऊड) लाल भोपळा
गोडा मसाला
लाल मिरची पावडर
मीठ
साखर
तेल
गव्हाचे पीठ
बेसन
टीप: या पाककृतीला प्रमाण असे ठराविक नाही आपल्या मर्जीने जिन्नस घालून पराठे करायचे.
कृती:
लाल भोपळा धुवुन ४५० डीग्री फॅरेनहाईटला २० मिनीटे बेक करून घ्यायचा. तेल वगैरे लावायची गरज नसते.
बेक केलेला भोपळा गार झाला की त्याचा गर चमच्याने काढून घ्यायचा. त्यात लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, किंचीत साखर घालायची. हवी तर थोडी कोथींबीर चिरुन घालायची.
भोपळ्याचा गर, आणि घातलेला माल मसाला नीट कुस्करून एकत्र करायचा. यासाठी फूप्रोसेसर वापरा असेल तर.
त्यात २-३ खायचे चमचे बेसन आणि थोडे थोडे करत गव्हाचे पीठ घाला. साधारण १ ते १.५ कप पीठ लागू शकेल.
पीठ नेहेमीप्रमाणे मौसर भिजवून त्याचे पराठे करा. भाजताना दोन्हीकडून तेलाचा हात लावा. घडी घालायची गरज नाही!
मी पिठात थोडे बदामाचे पीठ घालते, इथे ते सहज उपलब्ध आहे म्हणून.