जून अर्धाअधिक संपत आला पण "सृजनाच्या वाटा"साठी काही विषय पक्का होईना. तिकडे निसर्गाची शाळा या विषयाला नंदिनीने शेवटी ६ थम्ब्ज अप दिलेत आणि पुढे शांतता.. :rollingeyes:
म्हणून मग तोच विषय आहे असं समजून आपण आता शाळा सुरू करु. :biggrin:
(ड्रॉपडाउनमध्ये अजून जून येत नाही, पण अॅड होईल तेव्हा हा धागा त्यात टाकता येईल)
इथं फळं, फुलं, पानं, झाडं यांचे फोटो दिलेत. त्यावरुन ते फळ, फूल, पान, झाड ओळखायचं. काही इतर माहिती देता आली तर द्यायची. सुरुवातीचे फोटो मी देते. पुढे कोणीही देऊ शकता. फक्त एक संच पूर्ण ओळखून झाल्यावरच पुढचे फोटो देऊया.
चित्र १
मी सफरचंद नाही!
चित्र २
हे ओंजळीहून मोठं फूल आहे.
चित्र ३
मी मसालेदार
चित्र ४
या कळ्या आहेत. याची पांढरी छोटी फुले होतील आणि मग बिया! पण पानांकडेही लक्ष द्या.
चित्र ५
कशाचा वेल आहे, फळाचे वजन पेलेल का?
फोटोखाली थोडे क्लू दिलेत.
--------------
नवीन चित्रं- थोडं सोपं, थोडं अवघड.
चित्र ६
मागचं पिवळं फूल कशाचं ते ओळखायचं आहे. पुढचं एक weed आहे, दिसतं छान पण मला नाव नाही माहीत. ते सांगितलं तरी चालेल.
चित्र ७
चित्र ८
चित्र ९
हे सोपं आहे. :P मला याचा रन्ग खूप आवडतो म्हणून दिलाय.
चित्र १०
हे काय तुम्हाला येणार नाही. :biggrin: