पाडवा स्पेशल... दिव्यांची मिठाई

साहित्य: एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, दोन टीस्पून कोको पावडर, वातींसाठी अर्धी वाटी काजूगर, पाव वाटी साखर केशरी रंग, दिव्यातील तूप म्हणून व्हाईट चॉकलेट कंपाउंड, थोडं दूध, सिल्व्हर बॉल्स_20181108_130735minalms.jpg
कृती: दिव्यासाठी च्या काजूची पावडर करा. त्यात कोको पावडर मिसळून घ्या.कढईत अर्धी वाटी साखर घ्या. त्यात पाव वाटी पाणी घाला. साखर विरघळू द्या. आता त्यात तयार काजू पावडर मिसळून ढवळत रहा. घट्ट होऊ लागलं की खाली उतरून घोटत रहा. गोळा झाला की ताटात काढून मळा. छोटा गोळा घेऊन दिव्याचा आकार द्या. सगळे दिवे करून घ्या.
आता वाती साठी काजू पावडर करा. अगदी तजोड खायचा रंग किंवा केशर सिरप घ्या. कढईत पाव वाटी साखर घ्या.थोडं पाणी घाला. साखर विरघळली की त्यात तयार पावडर आणि रंग मिसळा. दोन मिनिटं ढवळून खाली उतरवा. घटून गोळा करा. वाती तयार करून घ्या._20181108_130716minalms.jpg
आता एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळवा. दुसऱ्या छोट्या भांड्यात व्हाईट चॉकलेट कंपाऊंडचे तुकडे घ्या. अगदी थोडं दूध घाला. उकळत्या पाण्यात भांडं धरून चॉकलेट वितळवून घ्या. डबल बॉयलर पद्धतीने! आता तयार दिव्यात पटापट चॉकलेट घाला. जरा घट्ट झालं की तयार वाती उभ्या करा.IMG_20181108_135128minalms.jpg
मस्त वेगळी दिवाळी स्पेशल मिठाई तयार आहे!_20181108_134927minalms_1.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle