घरचे झाले थोडे नी ... परिस्थिती असताना खूप काही करता येत नाही तरी त्यातल्या त्यात जमेल ते करत असते ... श्रेय अर्थातच तुमच्यासारख्या उद्यमी मुलींना जाते ज्या प्रेरणा बनतात माझ्यासारख्या व्यक्तीला.
मुलींनो बघा नी सांगा कशा झाल्या आहेत गोष्टी ...
हे संक्रांत स्पेशल ...
वॉल हँगिंग करताना मजा आली खूप
हे काही ऑर्डर प्रमाणे केलेले बटवे
ओटी बटवे
तेंव्हाच एका मैत्रिणीने म्हटलं मला खणाच्या कापडात शिवून देशील का ओटी बटवे ?....
मेंदूला नवीन खाद्य म्हटल्यावर मी कसली नाही म्हणते ...
तेंव्हाच दुसरी एक मैत्रीण म्हणाली तू या बटव्यांना ओटी बटवा म्हणून लिमिट का करतेस?
गिफ्ट पोटली म्हणून ही वापरता येतील की हे ....
मग त्या थीमनुसार फोटो काढले
ही रिव्हर्सिबल जापनीज नॉट बॅग ..पार्टीसाठी मस्त होते ही,त्यात एका बॅगमध्ये दोन वेगळे लूक म्हणून माझी फेव्हरेट
लूक1
लूक2
ही प्लास्टिक बंदी जिंदाबाद बॅग ... कप्पेच कप्पे ...परत वॉटर रेजिस्टंट, वॉशेबल ... और क्या चाहीये
रिव्हर्सिबल जॅकेट
शिवायला घेतलं तेंव्हाच लेकीचं माप आणि पूर्ण झालं तेंव्हाच माप यात बराच फरक पडल्याने फिटिंग ची बोंब झाली पण तो प्रश्न तिच्या मावशीने , आपण त्या जॅकेटमध्ये कसे परफेक्ट फिट होतो म्हणत सोडवला (पळवला?) :ड
हे लेटेस्ट काम
इथल्याच मैत्रिणीला खाणाची कुशन कव्हर्स हवी होती,ते काम सुरू असताना ती म्हणाली एक परकर पोलका देशील का शिवून? ...प्रयत्न करते म्हटलं नी केलं काम सुरू... सोबत एका वर्षाच्या पिल्लूसाठी झब्बा ही शिवला.
मॉडेल्स इतके गोड आहेत की त्यांचं काम मी कधीच नाकारू शकत नाही :dhakdhak:
ही ती कुशन कव्हर्स जिथून गोष्ट सुरु झाली
हा लेटेस्ट बटवा