आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या घरचा शेफ मध्ये माझी रेसीपी आलीय. त्यांनी रेसिपीचा फोटो वेगळा दिलाय. मूळ फोटो आणि रेसीपी शेअर करतेय.
साहित्य: अर्धा की सीडलेस खजूर, 12 लिंबं, तीन चमचे लाल तिखट, दीड वाटी गूळ, अर्धा चमचा शेंदेलोण, अर्धा चमचा पादेलोण, एक चमचा जीरं पावडर, अर्धा चमचा साधं मीठ
कृती:
खजुराचे चार तुकडे होतील असे तुकडे करावे. लिंबाचा रस काढून घ्यावा. गूळ बारीक चिरावा. स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात खजूर, गूळ, लिंबाचा रस, शेंदेलोण, पादेलोण, मीठ, तिखट, जीरं पावडर सर्व एकत्र करावे. एक दिवस तसेच ठेवून मुरू द्यावे. दुसऱ्या दिवशी खायला घेता येते. चव अप्रतीम!!!