अनार कढी/ डाळिंबाचे सार:

अनार कढी/ डाळिंबाचे सार: _20181123_113437minalms_1.jpg
दोन किलो डाळिंब आणलेली घरी, कोणी फारसं खात नव्हतं..मी वाटच बघत होते, कधी एकदा करून बघायला मिळतंय याची..मग काय आज मुहूर्त लागला!
साहित्य: चार डाळिंब सोलून दाणे, एक नारळाचं खोबरं, मीठ, दोन तीन ओल्या मिरच्या, चार चमचे साखर, दोन चमचे आरारूट, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, चिमूटभर हिंग, कढीलिंब पाच सहा पानं.
कृती: डाळिंब सोलून दाणे काढून घ्या. ज्युसर जार ला पाणी घालून फिरवा. एका पातेल्यात गाळून घ्या. खोबऱ्यात दोन वेळा पाणी घालून फिरवा, त्याच पातेल्यात गाळा. मीठ, साखर, मिरची वाटून घाला. आता छान ढवळा. तुम्हाला जर गार सोलकढी सारखं प्यायचं असेल तर तयार कढी/ सार गार करून सर्व्ह करा.
आमच्याकडे सार थोडं गरम आवडतं. म्हणून मी त्यात कढीलिंब पानं घातली. वरून तुपाची हिंग, जीरं घालून फोडणी दिली. दोन चमचे आरारूट थोड्या पाण्यात कालवून साराला लावलं. आणि जेवताना फक्त गरम करून घेतलं!_20181123_113700minalms.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle