बर्याच जणिंनी इथे लिहिले आहे कि त्यांचा ढोकळा नेहमीच बिघडतो म्हणुन ही रेसिपी लिहिते आहे. या रेसिपीने माझा ढोकळा कधीच बिघडत नाही.
साहित्यः
१ टीस्पुन सायट्रिक अॅसिड पावडर (याने बर्यापैकी आंबट होतो. तुम्हाला वाटले तर कमी जास्त करु शकता पण किमान पाउण चमचा तरी हवीच)
मी ही वापरते.
३ टे.स्पुन साखर
१ चमचा मीठ
१ ग्लास पाणी
१ टीस्पुन चमचा बेकिंग सोडा
तेल
बेसन पीठ
कृती:
गॅसवर ढोकळा वाफण्यासाठी भांडे ठेवा आणि त्यात पाणी गरम करायला ठेवा. आता एका पातेल्यात १ ग्लास गार पाणी (मी स्टिलचा पाणी पिण्याचा ग्लास घेते.) घेउन त्यात १ चमचा सायट्रिक अॅसिड, साखर आणि मीठ टाका आणि चमच्याने हलवा. सगळं व्यवस्थित पाण्यात विरघळले पाहिजे. आता त्यात मावेल एवढे बेसन पीठ टाका. डोस्याच्या पिठाचा कसिस्टन्सीचे झाले पाहिजे. गुठळ्या नकोत. ढोकळा करायच्या ताटाला तेलाचा हात लावुन घ्या. मग एक टे.स्पुन तेल घ्या. त्यात बेकिंक सोडा मिक्स करा आणि हे तेल पीठात टाका आणि हलक्या हाताने पटापटा एकाच दिशेने हलवा. मिश्रण फुगले कि पटकन ताटात पसरवुन वाफायला ठेवा. साधारण १५ मि. वाफवला जातो.
गार झाल्यावर तेलात मिरची, जिरे, मोहरीची फोडणी देउन त्यात पाव ग्लास पाणी टाका. त्यात थोडीशी साखर, मीठ टाकुन ते पाणी ढोकळ्यांवर पसरवा. वरतुन कोथिंबीर टाका. झाला ढोकळा तयार.
ढोकळ्याविषयी दुसरा धागा : ढोकळा - रेसिप्या, चर्चा, आधारगट वगैरे