थंडी स्पेशल भूक लाडू

साहित्य - तीळ 1 वाटी, डाळव दीड वाटी, खसखस पाव ते अर्धी वाटी आपल्या आवडीप्रमाणे, शेंगदाणे अर्धी वाटी, सुक खोबर खिसून अर्धी वाटी,सव्वा ते दीड वाटी चिरलेला गूळ
कृती - गूळ सोडून सर्व घटक पदार्थ सेपरेट सेपरेट मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. दाणे भाजून साल काढून घ्यावे. डाळव कमी भाजायचेत कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात. माझ्याकडे दाण्याचं कूट आणि खसखस भाजून वाटलेली होती म्हणून डायरेक्ट तीच घेतली.

20181216_120345.jpg

नंतर सर्व पदार्थ मिक्सीतून सेपरेट सेपरेट वाटून घ्या, कूट भरड नको रहायला. तसेच लक्षात असू द्या वाटताना सतत लक्ष देऊन वाटा, तेल सुटून गोळा व्हायला नकोय कशाचाही.

20181216_120359.jpg

आता सगळी कूट आणि डाळव्याच पीठ ह्यात चिरलेला गूळ घालून एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्या.आता मिश्रणाला तेल सुटायला लागेल. मिश्रण भरभरीत दिसलं तरी लाडू वळताना त्याला तेल सुटत आणि लाडू व्यवस्थित वळले जातात.

20181216_120412.jpg

आता मिश्रण ताटात काढून लहान साईजचे लाडू वळा. तीळ, खसखशीमुळे खमंग टेस्टी लाडू बनतात. लहान भुकेला उपयोगी पडतात आणि पौष्टिक पण असतात.
ह्यातल्या घटक पदार्थांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसेच आमच्याकडे कमी गोड खातात म्हणून मी गूळ कमी घेतला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वाढवा.

20181214_172806.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle