संत्रा भात

संत्रा भात: या सीझनला मिळणारी संत्री खूप दिवस खुणावत होती. आज करण्याचा योग आला. IMG_20181221_120742.jpg
साहित्य: एक वाटी तांदूळ, एक वाटी साखर , एक वाटी पाणी, दोन वाट्या संत्र्याचा रस( साधारणपणे चार संत्र्याचा), मीठ, तूप दोन चमचे, चार लवंगा, काजूगर दहा बारा, बदाम काप, बेदाणे, केशर सिरप( ऐच्छिक) एक चमचा. संत्र्याच्या फोडी आणि साल सजावटी साठी, वेलची पावडर अर्धा टीस्पूनIMG_20181221_181644minalms.jpg
कृती: संत्री सोलून घ्या. बिया बाजूला करून रस काढा. एका संत्र्याच्या फोडी सोलून सजावटीसाठी ठेवा. रस गाळून घ्या. तांदूळ धुवून निथळत ठेवा. कढईत तूप घाला. त्यात लवंगा घाला, परतून झालं की तांदूळ घाला. परतून घ्या. कुकरच्या डब्यात तांदूळ काढून त्यात एक वाटी पाणी आणि एक वाटी संत्र्याचा रस घालून कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्या. भात गार होऊ द्या. काजूगर गरम पाण्यात ठेवा. बदाम काप करा. बेदाणे स्वच्छ करून घ्या.कढईत साखर आणि एक वाटी संत्र्याचा रस एकत्र करा. चवीपुरते मीठ घाला. गॅसवर ठेवून साखर विरघळू द्या. गॅस बारीक ठेवा. काजूगर, बदाम काप, बेदाणे घाला. वेलची पावडर घाला. केशर सिरप घाला. शिजलेला भात मिक्स करा. मंद गॅसवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. दहा मिनिटांनी गॅस बंद करा. सर्व्ह करताना ताज्या संत्र्याच्या फोडीनी सजवून सर्व्ह करा.IMG_20181221_120742minalms.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle