पुणे मैफिल: धम्माल: मज्जा

पुणे मैफिल: मज्जा, मस्ती, धमाल

सध्या पुणेकर झाल्यामुळे मैत्रीण च्या मैफिलीत धमाल करता आली. मनात होतंच, आधीच इकडे आल्यामुळे सख्यांना आठवण भेट काय न्यावी सुचत नव्हतं. झटपट खजूर लोणचं केलं, भावना अगदी दाराशी न्यायला आली आणि आम्ही पोचलो. भावनाशी इतक्या गप्पा झाल्या की पहिल्यांदा भेटलीय असं वाटलंच नाही... जवळपास पोचत आल्यावर तिच्या लक्षात आलं मला घ्यायचं राहिलं, बिचारी परत आली मला न्यायला... Bighug पोचताच चिवचिवाट ऐकू आला आणि कळलं योग्य जागी आलोय. जवळपास सर्वांनी मला ओळखलं. प्रत्येकीने आणलेल्या खूप साऱ्या चॉकलेट्स नी तोंड गोड झालं. एक एक येऊन ऍड होत होत्या... ओळख परेड, खाणं, गप्पा, मस्ती सगळं चालूच होतं. ज्ञाती छान मुलाखत घेऊ शकते! प्रिमो फुलपाखरू आहे. अवलताई ने संक्रांत स्पेशल गोड गिफ्ट दिलंय. खरं तर बाहेर पडल्यावर अजून गप्पा सुरु झाल्या पण प्रत्येकीलाच निघायची घाई होती.
तरीही अजून बऱ्याच जणींच्या बद्दल लिहायचं राहिलंय पण बाकीच्यांनी प्रतिसादात भर घाला गं!
येताना मला एकदम व्हीआयपी सर्व्हिस होती, अनघाने मला अगदी घरापाशी सोडलं..आम्हीही येताना बडबड करतच आलो...तरंगत..हसत हसत घरात कधी पोचले कळलंच नाही... पोतडीभर आठवणी घेऊन आलेय.. परत भेटेपर्यंत पुरवण्यासाठी! Bighug

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle