पोपटी कमी तिखट मिरच्या ८/१० - सधारण अर्धा सेमी इतके तुकडे करुन
लसुण ८/१० अगदी बारिक चिरुन
मोहोरी,
कलिंगडाच्या बिया मोठा चमचाभर
भोपळ्याच्या बिया थोड्या
तिळ साधारण दोन छोटे चमचे
कडीपत्ता २/३ पाने
आमचुर पावडर , मीठ - चवीप्रमाणे
थोडे तेल. ( सगळा ऐवज तेलात निट परतला गेला पाहीजे पण खुप अतिरिक्त तेल नको)
गरम तेलात मोहोरी टाकणे. ती तडतडली की कडीपत्ता आणी लसुण टाकणे. लसुण जरासा गुलाबी होत आला की मिरच्या टाकणे. मिरच्या आणी लसुण चांगले तळले गेले पाहीजेत. मग कलिंगड बिया, भोपळा बिया आणि तीळ टाकुन अजुन थोडं परतवणे. बिया कुरकुरीत झाल्या पाहीजेत. शेवटी मिठ आणी आमचुर पावडर टाकुन गॅस बंद करणे.
कशाही सोबत छान लागेल. थंडीत खायला मस्त.
- घरात काही नसताना केलेले माझे प्रयोग.