सफरचंदाची पोळी:
बऱ्याच वेळा पेशन्ट ला बघायला जाताना लोकं फळं घेऊन जातात. खूप सारी फळं आली की एखादा प्रयोगशील पेशन्ट असं काहीतरी करतो!
साहित्य: सफरचंदाचा किस एक वाटी, साखर पाऊण वाटी, दूध अर्धी वाटी, दूध पावडर 40 ग्रॅम( 10 रु ची दोन पाकिटं), वेलची पावडर, तूप एक चमचा
पारीसाठी: एक वाटी कणिक, एक चमचा बेसन, दीड चमचा तांदूळ पिठी, मीठ, दीड चमचा तेल
कृती: कणकेत तांदूळ पिठी, बेसन, मीठ आणि तेल घालून नेहमीच्या पोळ्यांसारखी भिजवा. झाकून ठेवा. सफरचंदाची सालं काढून किसून घ्या. कढईत तूप घाला. त्यात किसलेलं सफरचंद घालून दोन मिनिटं परता. आता त्यात दूध, साखर घाला. ढवळत रहा. घट्ट होऊ लागलं की दूध पावडर आणि वेलची पावडर घाला. घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करून गार करत ठेवा. खूप घट्ट झालं तर वड्या पडतील.. थोडं मऊ असू द्या. तरी घट्ट वाटलं तर दुधाच्या हाताने मळून घ्या. कणकेचा छोटा गोळा घ्या. त्याची वाटी करून कणके पेक्षा थोडा छोटा गोळा त्यात भरून उंडा तयार करा. कणकेवर लाटा. तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या.
साजूक तुपासोबत फस्त करा...अगदी खव्याच्या पोळी सारखी लागते.
टीप: 1)पोळी कातण्याने कातली तर दोन कारणं असतात एक तर कणिक आणि सारण सारखं पसरलं नाही.
2)दुसरं म्हणजे छान दिसावं म्हणून!
3) माझी आई साखर विरघळली की त्यातच कणिक घालून भिजवते आणि त्याची पोळी करते, भरत नाही.
4) पोळ्या करायच्या नसतील तर सारण अजून थोडं घट्ट करा आणि वड्या थापा!
एका वाटीत आठ पोळ्या झाल्या.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle