आमच प्लम ट्री दर वर्षी भरपूर फळांनी लगडतं. गेली काही वर्ष मी जॅम करतेय आणी excess फळ देउन टाकतेय, तरी खुप उरतात.
एका जॅपनीज रेस्टॉरंट मध्ये प्लम वइन घेतली हाेती आणी आवडली हाेती, तर हा प्रयोग करायचं ठरवले.
इंटरनेट आणी युट्यूब ची पारायण करून एक जेनेरिक रेसीपी बनवली.
जिन्नस:
साधारण २ किलाे प्लमसला ८०० ग्रॅम साखर, १ गॅलन पाणी, १ पॅकेट सायडर yeast.
उपकरणे:
ह्या वेतेरिक्त प्लमस् फरमेंट करायला एक माेठं भांड, वाइन ठेवायला एक डेमीजॅान, airlock with rubber stopper, फनल, हैड्रोमीटर आणी हे सगळं स्टरिलिझ करायला स्टरिलिझींग साेलयुशन.
कृती:
१.प्लमस् स्वच्छ धुन क्रश करणे.
२.कढत पाण्यात हे प्लमस् ५ दिवस भिजत ठेवणे.
३.पाच दिवसांनी साखर आणी yeast घालुन, नीट मिक्स करुन यीस्ट आणी साखर रिऍक्ट व्हायला ३ दिवस ठेवणे.
४.तिन दिवसांनंतर स्टरिलिझड गाळणीनी गाळून , डेमीजॅन मध्ये आेतणे आणी airlock & rubber stopper लावणे. Airlock मध्ये पहिले काही आठवडे पाणी चेक करावे लागते.
५.साधारण सात आठ महिन्यांनी दुसऱ्या डेमीजॅन मध्ये गाळणे. गाळताना खाली साचलेला साका वाइन मध्ये मिक्स हाेत नाहिना ह्याची काळजी घेणे. हैड्रोमीटरनी आलकाेहाेल पर्सेंट टेस्ट करणे.
६.पहिल्या ट्रेन्सफर नंतर ४ महिन्यात हि वाईन स्टरिलिझड बॉटल्स मध्ये भरणे.
अशा प्रोसेसनी केलेली ही वाइन खुप गाेड हाेत नाही, ही dry wine आहे. आपल्याला जर गाेड आवडत असेल तर बॉटल करायचया आधी साखर आणी potassium sorbate घालुन मग बॉटल करु शकताे. Potassium Sorbate stops the sugar to further convert into alcohol.
Enjoy!
सगळ्या मैत्रिणींना नवीन वर्षीच्या खुप खुप शुभेच्छा.