सफरचंदाचे घारगे

IMG_20190103_152038minalms_0.jpg

सफरचंदाचे घारगे

सफरचंद जरी काश्मीरला होत असलं तरी त्याला आमच्या कोकणी हुकमी एक्के वापरून अगदी कोकणी करून टाकलं! तांदूळ पिठी, गूळ आणि खोबरं मग चव काय अफलातून येणारच!

साहित्य :
एक सफरचंद
पाऊण वाटी गूळ
मीठ
पाव चमचा हळद
पाव वाटी ओलं खोबरं
दीड वाटी तांदूळ पिठी
एक वाटी कणिक
दोन चमचे तेल पिठात घालायला
तेल तळणीसाठी

कृती:

  • सफरचंद धुवून साल काढा. सफरचंद किसून घ्या.
  • कीस मोजा, एक वाटी किसाला पाऊण वाटी गूळ, चवीपुरते मीठ, दोन चमचे तेल,ओलं खोबरं, हळद घालून गॅसवर ठेवा.
  • गूळ विरघळला की गॅसवरून उतरवा.
  • लगेच दोन्ही पिठं मिक्स करा.IMG_20190103_134449minalms.jpg
  • घट्ट गोळा बनवा.
  • छोट्या गोळ्या करून घ्या.
  • प्लॅस्टिक कागद किंवा केळीच्या पानावर थापून किंवा लाटून घारगे करा.
  • कढईत तेल तापवून घारगे तळा.

IMG_20190103_145544minalms.jpg

साजूक तूप किंवा लोण्यासोबत झकास लागतात.
IMG_20190103_152052minalms_0.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle