पार्ट 1
स्वयंपाक आणि सकारात्मक ऊर्जा
“आज माझ्या आवडीची छान गाणी लागली होती ती ऐकत ऐकत स्वयंपाक कधी झाला हे कळलेच नाही स्वयंपाक करताना खूप छान वाटलं”.
हल्ली बऱ्याचदा आपल्याला वाचायला मिळत की मुले टीव्ही बघत जेवत असतात आणि ते त्यांच्यासाठी योग्य नाही। जेवण करताना संपूर्ण लक्ष जेवणावरच असले पाहिजे म्हणजे त्यातून योग्य ती ऊर्जा मिळते। नाहीतर जे काही पाहत जेवण करतो तेच विचार आणि तशीच ऊर्जा मिळत जाते।
मग तसच स्वयंपाक करतानाच आहे। स्वयंपाक करणाऱ्याची मानसिकता ही तितकीच महत्वाची असते।
शांत, प्रसन्न मनाने आणि मनात चांगले विचार ठेऊन जेव्हा स्वयंपाक केला जातो तेच विचार त्या स्वयंपाकात उतरतात
जो आहार आपण घेत असतो त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळणं महत्त्वच असत।आहारातून आपल्या विचाराची जडणघडण होत असते.’मी जे काही पदार्थ करणार आहे ते खाणाऱ्याला सकारात्मक ऊर्जा आणि उत्तम विचार या पदार्थतुन ते खाणाऱ्याला मिळणार आहेत ‘ असा विचार स्वयंपाक करताना मनात असला तर नक्कीच त्या पदार्थतुन सकारात्मक ऊर्जा खाणाऱ्याला मिळेल
स्वयंपाक करताना छान गाणी ऐकत किंवा गुणगुणत केला की लयबद्धतेत स्वयंपाक होतो किंवा मग एखादे स्तोत्र ऐकत स्वयपाक केला तरी त्या स्रोतांमधील चांगली ऊर्जा आपण आपल्या कुटूंबियांना देऊ शकतो
पुढील आणखी एका लेखात याच विषयावर सविस्तर माहिती बघू
धन्यवाद
वंदना देशपांडे