स्ट्रॉबेरी लोणचे:
आता तुम्ही म्हणाल स्ट्रॉबेरी नुसती खायची सोडून हे उद्योग कशाला? पण काही वेळा आंबट निघतात मग असं चविष्ट करायचं!
साहित्य: दोन वाट्या स्ट्रॉबेरीचे तुकडे, पाव वाटी साखर, दीड टीस्पून लाल तिखट, मीठ, पाव टीस्पून मेथी, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, दोन टीस्पून तेल
कृती: स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून, पुसून आवडीप्रमाणे तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, मेथी, हिंग हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा, गार होऊ द्या. स्ट्रॉबेरीच्या तुकड्यात साखर, मीठ आणि तिखट मिसळा, गार झालेली फोडणी मिसळून ठेवा. मेथांब्यासारखी चव येते.
हे लोणचं टिकाऊ नाही..लगेच वापरता येते.
✍
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle