ही पूर्णपणे लाराच्या डोक्यातून निघालेली पाककृती आहे.
घटक पदार्थ : बीया नसलेली द्राक्षं.
कृती : द्राक्ष स्वच्छ धुऊन, काड्या काढून बोल्स मधे ठेऊन फ्रीजरमध्ये घट्ट बर्फ होईपर्यंत ठेवायची. चांगले टणक गोटे झाले की मिक्सरमध्ये घालून बारीक होईपर्यंत पटकन फिरवायची. जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही. पटापट बोल्/मग मध्ये काढून खायची.
हवं तर या स्लशीवर लिंबू पिळायचं.
फार फार मस्त लागतं. साखर वगैरेची गरज अजिबात नाही. द्राक्षांसारखीच स्ट्रॉबेरीची देखिल करता येईल. स्ट्रॉबेरी काहीशी आंबट असल्यानं द्राक्षं- स्टृऑबेरी एकत्र करूनही करता येईल.
हिरव्या द्राक्षांची स्लशी :
काळ्या द्राक्षांची स्लशी :
एंजॉय! :)