रोड ट्रिप: कच्छचे सफेद रण, गुजरात

सफर में जो मजा है वो मंज़िल में कहाँ! पण आमची मंज़िल आणि सफ़र दोन्ही अगदी अविस्मरणीय झाले ही त्याची गोष्ट.
वय वर्ष ७ आणि ५ ची दोन पार्सल सांभाळून हा ८ दिवस आणि २२०० किलोमिटरचा प्रवास भलताच धमाल झाला.
तर मुख्य आकर्षण होतं कच्छचे सफेद रण-White dessert. पुण्या पासून हे अंतर आहे जवळपास ११०० km. मुली लहान असल्याने आम्ही driving चा वेळ कमी ठेवायचं ठरवलं. दिवसाला ४०० ते ५०० km आणि प्रत्येक मुक्कामी पुरेशी विश्रांति. सुदैवाने रस्त्याने बडोदा, अहमदाबाद, भुज सारखी उत्तम सोयी सुविधा असलेली ठिकाणं असल्याने planning सोपं झालं . अर्थात याचं श्रेय पूर्णतः आमच्या यांचं हां! Hotels,best path,reviews, best food of city इत्यादि सगळी शोधाशोध अहोंनीच केली!
तर ही थोडक्यात माहीती.
आम्ही भल्या पहाटे ५.०० वाजता पौड रोड,पुणे येथून निघालो.
मुलींना झोपेतच उचलून गाडीत टाकलं. (रात्रीच प्रवासायोग्य कपडे घालून झोपवलं होतं. आम्ही जाताना तीन टप्प्यात तर येताना दोनटप्प्यात प्रवास केला.
हा आमचा ढोबळ मार्ग आणि जरा फापट माहिती
टिप*स्वतः drive न करता जायचं असेल तर भुज पर्यन्त Railway किंवा विमानाने पोहोचता येईल. तिथून मग तुमच्या resort तर्फे ने आण केली जाते.

पहिली मजल:
अंतर:५५० KM
लागलेला वेळ: १० तास
(breakfast, शु-शी ब्रेक्स- दुपारचे जेवण,चहा ब्रेक्स धरुन)
पुणे- चांदणी चौक- पुणे मुंबई express way- ठाणे- कासार वडवली-घोडबंदर रोड-
मॅनर- डापचारी- तळासरी- भरूच- बडोदा(अलकापुरी)
पुण्याहून लौकर निघण्याच मुख्य कारण मुंबईची रहदारी सुरु होण्या आधी ती ओलांडणं. दुसरं कारण, मुली झोपेत आहेत तोवर होता होईल तेवढं अंतर कापणे!
न्याहरी साठी आम्ही फाउंटन हॉटेल, घोड्बंदर रोड ला थांबलो. स्वच्छतागृह यथा तथाच, नाष्ताही ठीक.
दुपारचं जेवण गुजरात हद्दीत झालं. भरुचच्या स्वामी नारायण मंदीरात. जेवण ओके ओके असलं तरी कमाल स्वच्छ टॉयलेट्स!
गुजराथ हद्दित अतिशय मेंटेंण्ड रस्ते, अमाप लहान मोठी हॉटेल्स, माफक टोल, स्वच्छ स्व.गृ. हे अगदी कौतुकास्पद आहे.
तर असे भरपूर स्व.गृ. पावन करत आम्ही दुपारी अडिच तीनला बडोद्यात पोहोचलो.
आम्ही बडोद्यात निवांत राहीलो काही भेटी गाठी असल्याने. नाहीतर एक रात्र विश्रांती पुरेशी आहे पुढच्या driving साठी. बडोदा अत्यंत टुमदार आणि देखणं शहर आहे. खादाडीची येथेच्छ रेलचेल. पोरींना सयाजी बागेत फार मज़ा आली होती.

दुसरी मजल:
अंतर:४४० KM
वेळ: सात साडेसात तास

बडोदा- अहमदाबाद- हलवड-भचाऊ-भुज
हा मुक्काम आम्ही जाताना खास घेतला कारण टेंट सिटी ला आम्हाला अगदी फ़्रेश पोहोचायचं होतं. त्यांनी दिवसभर गच्च कार्यक्रम योजले असतात. पण to our surprise आम्ही हा छोटूकला मुक्काम पण कमाल enjoy केला. आमचा home stay अतिशय आकर्षक आणि सुखाचा होता. एक साधारण बांधलेल्या दुमजली घरांची लहानशी colony. त्यात एका घराच्या गच्ची वर अतिशय कल्पकतेने आणि सोयी सुविधांनी सज्ज अशी आलीशान हट उर्फ़ मिनी शमियाना होता. Airbnb Link देतेय फ़ोटो अवश्य बघा. Bhuj Home Stay
इथे प्रसिद्ध कच्छी दाबेली खाल्ली!जी चक्क तिखट आणि अतिशय तेलकट होती, पण फारच चविष्ट! खादाडीचा सुळसुळाट इथेही होताच. घरी परतताना हा टप्पा वगळला.

तिसरी मजल:
अंतर:८० KM
वेळ:२ ते अडीच तास

भुज- टेंट सिटी-दोरडो (रण उत्सव)
हे या ट्रिपचं prime attraction!
कच्छच्या रण जवळ अनेक लहान मोठे टेंट स्टेज आहेत. मुख्य दोन आहेत White Rann Resort आणि Tent City. आम्ही Tent City मधे राहीलो होतो. याचं management सयाजी hotels च आहे. Railway station/ विमानतळ ने आण, खाणं- पिणं , अंतर्गत ने आण, कालो डूंगर ट्रिप, एखाद्या खेड्यात वस्तीत shopping ट्रिप- (आम्हाला गांधी नु ग्राम मधे नेलं होतं),रण मधे सूर्यास्त सूर्योदय( पोरी न उठल्याने we missed this) वगैरे गोष्टी अंतर्भूत आहेत.
आम्ही यांचं २ दिवस २ रात्र package घेतलं होतं. जास्त दिवसही राहता येतं. मग मांडवी बीच वगैरेही फिरवून आणतात हे. रहायची सोय उत्तम होती. आम्ही थंडी किंवा उकाडा फार नसेल अशा November मधे गेल्याने non AC टेंट घेतला होता.

खरेदीला अफाट वाव आहे.टेंट सिटी जवळच shopping area आहे. (त्या टेंट सिटीच्या आतही बरीच दुकानं थाटली आहेत पण तुलनेने महाग वाटली. बांधणी ड्रेस , साड्या, कच्छी ओढण्या, शाली, सुंदर आणि लाम्ब रुंद दुलया, कच्छी कलाकारीचे बेड शीट्स/स्प्रेड्स, junk jwelery,चामड्याच्या वस्तु या काही ठळक गोष्टी.
ही रण उत्सवची लिंक
Rann Utsav

मुलां सोबत कार प्रवासाची पूर्व तयारी:
कार मधे हवा, पेट्रोल इ. तपासून भरुन घेणे.
स्टेपनी मधेही हवा नीट भरून घेणे.
मुलांसाठी खाऊ:ज्युस, फ्लेवर्ड मिल्क, चिझ स्लाइस, ब्रेड बटर, बिस्कीट, चॉकलेट, फळं(आपण हॉटेलला थांबतो तेंव्हा यांना भूक तरी नसते किंवा झोपेत तरी असतात!)
वेट वाईप्सः हे कमाल उपयोगी पडतात.
मुलांच्या आवडीच्या गाण्यांची प्ले लिस्ट.
अत्ता तरी इतकच डोक्यात येतय.

बाकी हे लिहायला फारच उशीर झालाय. रण उत्सव साधारण १५/२० नोवेंबर ते १५/२० फेब्रुवारी असतो.
यंदा नाही जमलं तरी पुढच्या वर्षी ठरवा!
ताजा कलमः कच्छ हा संवेदनशील सीमा भाग असल्याने Photo ID proofs बाळगण अगदी अनिवार्य आहे.रणात जायला BSFचा पास घ्यावा लागतो. बहुतांश resorts/हॉटेल्स हे काम करतात.

भूज, कच्छी दाबेली
IMG_8495.JPG

भरुच, स्वामी नारायण मंदिर
IMG_7566.JPG

कच्छचे रण आणि टेंट सिटी
IMG_8204.JPG

IMG_E8591.JPG

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle