मखाणे खीर

मखाणे खीर: _20190128_133704minalms.jpgमखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या...असं मी ऐकलंय.. ह्या खूप पौष्टिक असतात.
साहित्य: मखाणे तीन वाट्या, दूध तीन ली, साखर पाऊण वाटी, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, बदाम काप, केशर काड्या, तूप
कृती: मखाणे चमचाभर तुपावर परतून घ्या. त्यातले छोटे थोडे तसेच घालायला बाजूला ठेवा. बाकीचे मिक्सरला फिरवून घ्या. कढईत दूध आटवत ठेवा. साखर आटवताना घाला. दोन लिटर झालं की त्यात मखाणे पावडर, अख्खे मखाणे, वेलची, दुधात खलून केशर, जायफळ सर्व घाला. उकळू द्या. बदाम काप आणि जे ड्रायफ्रूटस् हवे असतील ते घाला. चव बघून लागली तर साखर घाला. गार करून किंवा गरम आवडीप्रमाणे सर्व्ह करा.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle