व्हेज बार्ली सूप

कॉस्टकोच्या एका फेरीत क्विक कुकिंग बार्ली दिसली. नाविन्याची आवड या सदरात ती कार्ट मधे येऊन बसली. बसली ते बसली पण घरी येऊन पॅण्ट्री मधे बसून राहिली. काल शेवटी धीर करून तिला बाहेर काढली. एक सोप्पे सूप बनवले आणि त्याची टेस्ट इतकी आवडली की रेसिपी इथे शेअर करावीशी वाटली.

तर साहित्य:
१ मेजरिंग कप क्विक कुकिंग बार्ली
१ मध्यम कांदा बारीक चिरून
३-४ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून
६-७ बटण मश्रुम्स बा. चि.
६-७ ग्रीन बीन्स बा. चि.
१ छोटे गाजर बा. चि.
१/२ झुकिनी बा. चि.
१ लहान टोमॅटो बा. चि.

१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल किंवा बटर
चिकन स्टॉक/व्हेजिटेबल स्टॉक ६ कप (माझ्याकडे नव्हता म्हणून मी २ स्टॉक क्यूब वापरले)
आवडती अर्ब्स (मी ताजी पार्स्ली आणि डिल वापरले)
मीठ, मीरपूड

कृती
१) १ कप बार्ली मधे १.५ कप उकळते पाणी/स्टॉक घालून ५ मिनिटे ठेवायचे. नंतर गॅसवर ठेवून पाणी आटवायचे. आटले की ५-७ मिनिटे झाकण लावून शिजवायचे. (हे कुकरमधे होईल बहुतेक. मी पहिल्यांदाच करत असल्याने स्टोव्हटॉप मेथड ने केले)
२) एका जाड बुडाच्या सूप पॉट मधे तेल/बटर घालायचे. त्यावर बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून जरा परतायचे. २ मिनिटाने शिजायला वेळ लागणार्‍या भाज्या (बीन्स, गाजर वगैरे) घालून परतायचे. जरा त्या मऊ झाल्या की झुकिनी, मश्रूम्स, टोमॅटो वगैरे घालून जरा परतायचे.
३)भाज्या नीट परतल्या गेल्या की त्यावर एव्हाना शिजलेली बार्ली घालायची.
४)लगेच चिकन/व्हेज स्टॉक घालायचा. मीठ, मिरपूड हवी असतील तर ड्राय अर्ब्स घालायची. आणि झाकण लावून १० मिनिटे सगळे नीट शिजून द्यायचे.
५) दहा मिनिटांनी कन्सिस्टन्सी बघून गरज असेल तर पाणी वगैरे घालून एक उकळी आली की झाले. वरून फ्रेश अर्ब्ज घालायची. छान हार्टी सूप तयार.

अधिक टीपा:
१) बार्लीला छान टेक्स्चर आणि एक नटी फ्लेवर असल्याने बाकी काही बरोबर लागत नाही. शिवाय पोटभरीचे होते सूप.
२) प्रोटीन साठी याच सूप मधे उकडलेले मिक्स्ड बीन्स किंवा चिकन घालून शकता.
३) बार्लीच्या न्यूट्रीशन फॅक्ट बद्दल फार वाचले नाहिये पण कॉस्टकोच्या क्विक कुकिंग बार्ली कडून फार अपेक्षा नाहियेत माझ्या. एक वेगळे नॉव्हेल्टी ग्रेन आणि त्याच्या फायबर कंटेंट साठी म्हणून मात्र खूप छान वाटले.
४) फोटो फार महान नाही याची कृपया नोंद घ्यावीच.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle