पाऊस आला पाऊस आला
आई सोड ना गं बाहेर मला
पक्ष्यांचा किलबिलाटही झाला
बोलवती ते मला
रिमझिम रिमझिम
पडती थेंब टपोरे
छतावरी त्यांची थाप रे
मला घालती जणू साद रे
हिरवागार हा सभोवार निसर्ग
होईना मुळी पाण्याचा विसर्ग
एक ते कुंपणाशी तळे साचले
माझे जहाज पाण्यावाचून तळमळे
सर्दी पडश्याची का करते तू काळजी
चिमणी घेते का कधी अडुळसा अन तुळशी
भिजेन मी पावसात जराशी
वाहून जातील पुटे फुकाची
पाऊस आला पाऊस आला
आई सोड ना गं बाहेर मला