मुलींनो, जून महिन्यात २ आठवडे स्विझर्लंडला जायचा प्लॅन आहे. म्हणजे सध्या झ्युरिकचे टू अँड फ्रो ति़कीट काढले आहे. २ आठवडे स्विझर्लंडमध्ये घालवायचे का शेजारच्या एखाद्या देशाला (ऑस्ट्रिया/जर्मनी/इटलीचा न पाहिलेला भाग) पण भेट द्यायची हे नक्की केले नाही आहे. इथे बर्याच जणी स्विझर्लंडला जाऊन आलेल्या आहेत. तर तुमच्या सजेशन्सची गरज आहे. आम्ही अजून हॉटेल (किंवा आजकाल airbnb वरुन अपार्टमेंट बूक करतो) बूक केले नाही आहे. फक्त एकाच ठिकाणी राहणार नाही आहोत (म्हणजे बेस फक्त झ्युरिक नाही). राहण्याच्या फिरण्याच्या दृष्टीने कोणती ठिकाणे रेकमेंड कराल? आमचा प्रवास हा मुख्यत्वे रेल्वेनीच होईल. झ्युरीक, इंटरलाकन, बाझल, टिटलीस, लुझर्न ही नावं सर्च केल्यावर मिळातात, पण अशी बरीच ठिकाणं असतील जी यात नाहीत पण हायली रेकमेंडेड आहेत. ग्लेशियर एक्सप्रेस, गोल्डन पास ट्रेन वगैरे अश्या सिनीक रेललाईन्स पण आहेत. तर तुम्ही काय सुचवाल? पटेल स्पॉट पेक्षा (किंवा बरोबरच) इतर फार हाइप्ड नसलेली पण मस्ट सी ठिकाणं असतील तर कृपया कळवा. आम्ही जूनच्या मध्यात जाणार आहोत, त्यामुळे हवा चांगली असेल अशी अपेक्षा आहे.
मी इथली मधुराईची सिरीज वाचली. खूप सुंदर आहे, आणि अनेक नवीन ठिकाणं कळली, पण आमचा सगळा प्रवास रेल्वेने होणार हे धरुन, त्यातल्या कुठल्या जागा मस्ट सी आहेत आणि रेल्वेने सहज जाता येतील हे कळले तर नक्कीच मदत होईल.
तसंच दिवस कसे स्प्लिट करवेत याबद्दलही सुचना चालतील. म्हणजे ८ दिवस स्विझर्लंडला भरपूर आणि ५-६ दिवस शेजारच्या देशात वगैरे.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle