फेरोंच्या देशात (ईजिप्त) भाग ३ दुसरा दिवसः आस्वान आणि अबू सिंबेल

आज भल्या पहाटे निघायचे होते. रात्री कैरोचा फेरफटका त्यामुळे लवकर आटोपता घेऊन थोडी झोप पूर्ण करावी या हेतूने लवकर झोपलो होतो. पहाटे ३ ला खोलीतले सगळे फोन तारस्वरात ओरडायला लागल्याने, काही समजायच्या आत आम्ही तिघेही जागे होऊन आवरायला लागलो. पटकन आवरून हॉटेलच्या लॉबी मधे येऊन चेक-आउट केले. भल्या पहाटे तिथेल्या माणसाने ३ मोठे बॉक्स माझ्या हातात यूअर ब्रेकफास्ट म्हणून कोंबले. त्याला काही म्हणणार इतक्यात बाहेर गाडी आली असे सांगत कालचाच गाईड आला. मग तसेच सामान गडीत टाकून कैरो एअरपोर्टच्या दिशेने निघालो. पहाट असल्याने अजिबात वर्दळ नव्हती. नंतर असे शांत कैरो कधीच दिसले नाही.
आज अगदी २० मिनिटातच एअरपोर्टला पोचलो. आमचे सामान अधिक ते ब्रेकफास्टचे बॉक्सेस असा एकदम गावाकडून आलेले लटांबर वाटत होते. गाईड ला ब्रेकफास्ट नको म्हणले तर त्याला बहुतेक आमचा प्रॉब्लेम कळला. तो म्हणला डोंट वरी सगळे असेच असतील आत.आत प्रचंड गर्दी होती. चेक-इन साठी भली मोठी रांग होती. पण गंमत म्हणजे खरंच सगळ्यांच्या हातात ते ब्रेकफास्ट बॉक्सेस होते. मग वेळ घालवायला मी आणि मुलाने कोण कुठल्या हॉटेल मधे आहे असा खेळ सुरू केला. नवरा मग वैतागून ४ पावले अंतर राखून लांब उभा राहिला. सिक्युरिटी ला भली मोठी रांग होती. पण कसे माहिती नाही आमच्या गाईड ने एकदम आम्हाला बरेच पुढे नेले. पाच-दहा मिनिटात बॅग्ज चेक इन करून झाल्या. गाईड तुम्हाला पुढचा माणून आस्वान मधे भेटेल असे म्हणून गेला. मग आमचे ते बॉक्सेस घेतलेले लटांबर एकदाचे फ्लाईट मधे बसले.

कैरो-आस्वान-अबू सिंबेल अशी ती इजिप्त एअरची फ्लाईट होती. मी खूप प्रयत्न करूनही मला आस्वान-अबू सिंबेल बुकिंग मिळाले नव्हते. त्यामुळे आम्हाला आस्वान ला उतरून तिथून गाडीचा प्रवास करणे भाग होते.फ्लाईट एकदम लहान होती. वेळेत सुटले आणि वेळेत पोचली. उतल्यावर लगेच आधीप्रमाणे इथे पण अगदी फ्लाईटच्या दारात आमचा गाईड हातात पाटी धरून उभा होता. फ्रेश होऊन, सामान कलेक्ट करून बाहेर पडलो. आज पण छान नवी कोरी मिनी व्हॅन होती. ड्रायव्हर आणि आमचा गाईड नासीर! नासिरने ताबा घेतल्या घेतल्या आमचे नामकरण महाराणी आणि महाराजा असे केले. नंतर मग काही झाले की त्याने सो मिस महाराणी डिड यू लाईक धिस? असे विचारून अगदी उच्छाद आणला. तेवढा एक बारीक प्रॉब्लेम सोडला तर बाकी तो चांगला होता. माहिती वगैरे छान देत होता.

अस्वान ही ईजिप्तच्या दक्षिणेकडची जुनी आणि मोठी सिटी आहे. इथून पुढेच सुदानची हद्द सुरू होते. आस्वान धरण आणि अबु सिंबेल यामुळे पर्यटकांचा ओघ पण इथे असतोच. नाईलच्या काठावर आहे आणि इथे नाईल आहे पण खूप रुंद आणि छान. आम्हाला आस्वान शहर बघणे शक्य नव्हते. डॅम आणि अनफिनिश्ड ओबेलिस्क बघून लगेच अबु-सिंबेल कडे निघावे लागणार होते.

लहानपणी भूगोलात नाईल आणि आस्वान धरणाबद्दल वाचले होते. एके काळी जगातले सगळ्यात मोठे असणारे हे धरण बघायची उत्सुकता होती. एअरपोर्ट पासून हाय डॅम फक्त ३० मिनिटावर आहे. १९६० पासून ७० पर्यंत या भल्या मोठ्या धरणाचे काम चालू होते. ऐन वेळेला अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी मदत नाकारल्यवर इजिप्तचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष नासिर यांनी रशियाच्या मदतीने हा अवाढव्य प्रोजेक्ट तडीस नेला. इथे जवळच इजिप्त-रशियाचे मैत्री स्मारक म्हणून लोटस मॉन्युमेंट पण आहे. बहुतेक सर्व धरणांप्रमाणेच या धरणाच्या आवश्यकतेबद्दल मतांतरे होती. गावेच्या गावे यामुळे विस्थापित झाली. एक अक्ख्ही जमात या धरणाच्या पाण्याखाली गेली. विस्थापितांचे नीट पुनर्वसन झाले नाही. गाळ भरून काही वर्षांनी हे धाण पण निरोपय्प्गी होण्याचा धोका आहेच. अशा अनेक कारणांमुळे या धरणाला बर्‍याच जणांचा प्रखर विरोध होता.तरी देखील नासिर यांनी हे काम पूर्ण केले. अर्थात डॅम मुळे औद्योगिक आणि इतर बरीच प्रगती झाली हे सत्यच आहे. जाताना आणि परत येताना गाडीत आमच्या गाईड नासिर बरोबर या वर छान चर्चा झाली.

बाकी डॅमच्या फॅक्ट्स वगैरे इंटरनेट वर उपलब्ध असल्याने इथे परत लिहित नाही.

हे डॅमचे फोटो
नाईल बेसिन. याने नक्की कशी नाईल वहाते आणि कुठे डॅम आहे याची कल्पना येते.

IMG_1399_0.jpg

IMG_1401_0.jpg

IMG_1402.jpg

अथांग पसरलेला लेक नासर
IMG_1406_1.jpg

IMG_1409.jpg

बाकी नंतर लिहिते.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle