हनी रोस्टेड अलमंडस

एक मैत्रीण मला भेटायला आली, येताना हनी रोस्टेड ड्रायफ्रूटस् घेऊन आली. ते इतके आवडले सगळ्यांना की मला शोधकार्य करावेच लागले! मिनोतीने झटपट रेसीपी दिली आणि मी घरातल्या वस्तू वापरून करून पाहिली.

साहित्य: एक कप बदाम, दीड टेबलस्पून मध, दीड टेबलस्पून पाणी, एक टीस्पून तेल(मी रिफाईंड शेंगदाणे तेल वापरले), एक टेबलस्पून पिठी साखर, पाव टीस्पून मीठ
कृती: बदाम मंद गॅसवर कढईत भाजून घ्या. बाजूला ठेवा. पसरट कढईत मध,पाणी आणि तेल एकत्र करून उकळायला ठेवा. एका पसरट भांड्यात पिठीसाखर आणि मीठ एकत्र करून बाजुला ठेवा. उकळी आली की त्यात भाजलेले बदाम घालून सगळं मधाचं मिश्रण आळेपर्यंत परतत रहा. आता परतलेले बदाम पिठीसाखर आणि मिठात घोळवा.
अशाच पध्द्तीने तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट पण करू शकता._20190207_152204minalms.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle