एगलेस कस्टर्ड पुडिंग:
साहित्य: एक कप दूध, एक कप मिल्कमेड, एक कप दही, एक टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, पाव कप साखर, पाणी
( एक कप: 250ml)
कृती: मिल्कमेड तयार वापरू शकता, मी घरी केलं.
१)अर्धा ली दूध, 200 ग्रॅम साखर, आणि 10 रु वाली दूध पावडरची दोन पॅकेट्स एकत्र करून एक कप होईल असं आटवा.
२) गार करत ठेवा.
३) सॉस पॅन मध्ये साखर अगदी थोडं पाणी घालून गॅसवर ठेवा.
४)भांडं हलवून हलवून वितळवून घ्या. गोल्डन कलर आला की त्यात पुडिंग करायचं त्या भांड्यात ओता.
५) गार झालेलं मिल्कमेड, दही, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून ब्लेंड करा.
६) कॅरॅमल सेट केलेल्या भांड्यात तयार मिश्रण ओता.
७) कुकरमध्ये खाली जाळी ठेवून पाणी घाला.
८) त्यावर हे भांडं ठेवून झाकण ठेवा.
९) शिट्टी न लावता 20 मिनिटं वाफवा.
१०) बाहेर काढून थोडं गार झालं की तीन तास फ्रिजमध्ये ठेवा.
११) एखादया प्लेटमध्ये भांडं उपडं करा.
१२) गारेगार सर्व्ह करा.
मिनल सरदेशपांडे