गली बॉय बद्दल ..

आज 'गली बॉय' पाहिला.फार आवडलाय. रॅप म्युझिक ,या जॉनर बद्दल फारसं काही माहित नव्हतं पण झोया अख्तर ,रणवीर सिंग आणि आलीया भट ,हा सगळं कॉम्बो ट्रेलर मधे इंटरेस्टिंग वाटल्याने हा सिनेमा पाहायचा,हे ठरवलं होतच.कथेबद्दल प्रोमो पाहून कल्पना आलेली. डिव्हाईन आणि नेझी या दोन रॅपर्स च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे ,हे प्रोमो पाहता पाहता खालच्या कमेंट्स वाचून समजलेलं.
स्टोरीलाईन प्रोमोत वाटते तशीच प्रेडिक्टेबल आहे. मुंबईत धारावीमधे राहणाऱ्या मुराद नावाच्या एका सामान्य मुस्लिम मुलाच्या सुरुवातीच्या स्ट्रगलपासून ,त्याला आपल्या पॅशनचा लागलेला शोध आणि आसपासच्या वातावरणातून वाट काढत ,त्याचा रॅप स्टार होण्यापर्यंतचा प्रवास,अशी कथा आहे. सध्या बायोपिक्सचा जमाना असल्याने अशा आशयाचे बरेच पिक्चर आले आहेत. पण गली बॉय सादरीकरणामुळे वेगळा वाटला .मेन स्टोरी लाइन सोबत अनेक वेगवेगळे सब ट्रॅकसचे लेअर्स आहेत ,त्या प्रत्येक स्टोरीबद्दल आपण नकळत विचार करत राहतो. मुरादच्या घरातलं ,आसपासचं वातावरण, त्याचे मित्र , रॅपर्स क्लब्ज ,त्यांच्या स्पर्धा हे तर आहेच .सोबत 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातली दरी ,शहरीकरणाचा भाग म्हणून वाढत जाणाऱ्या झोपडपट्या ,त्यातलं जीवन,एका पॉइंटवर अपरिहार्य वाटणारी गुन्हेगारी हे कोणताही मेलोड्रामा न दाखवता ,नेहमीचे घासून गुळगुळीत झालेले सीन्स न दाखवता फार साधेपणाने समोर येत पण तितकंच परिणामकारक वाटत. झोया अख्तरची सटल स्टेटमेंट करायची स्टाईल नेहमीप्रमानेच क्लासिक आहे.
सिनेमा मुंबईत घडत असला तरी नेहमीची मुंबई कुठेच दिसत नाही .दिसते ती उंच उंच बिल्डींग्सच्या मधून दिसणाऱ्या झोपड्यांची रांग,लहान लहान गल्ल्या त्यातली एकमेकांना घट्ट चिकटून असलेली घर,रात्रीची मुंबई ,त्यावेळचे शांत रस्ते, या सगळ्याचं पण एक कॅरॅक्टर आहे ,असं वाटलंत होतं.
रणवीर तर त्याची व्यक्तिरेखा जगलाय असं वाटावं इतका प्रामाणिक वाटतो.ज्या प्रसंगात त्याला डायलॉग्स नाहीत त्यातही तो केवळ डोळ्यांनी आणि बॉडी लँग्वेजने बोलतो. त्याच्या व्यक्तिरेखेचं व्यक्त होणं ,बुजलेपणा,ताण सगळं फार आश्वासकपणे मांडतो . त्याने स्वतः गायलेले रॅप सॉंग्स ऐकणं आणि त्या गाण्यात पडद्यावर पाहणं.अगदी ट्रीट आहे. आलिया आणि त्याची केमिस्ट्री तर अप्रतिमच. आलिया तिच्या कॅरॅक्टरमधे एकदम परफेक्ट वाटलीय.तिचे आणि रणवीरचे सुरुवातीचे काही सीन्स फार भारी वाटतात.सपोर्टींग कॅरॅक्टरमधे mc शेरच्या रोल मधला सिद्धांत चतुर्वेदी फारच प्रॉमिसिंग वाटला. इतर सगळे सपोर्टींग कास्ट मधले कलाकार पण बेस्ट आहेत.
डिव्हाईन आणि नेझीच ओरिजिनल रॅप सॉंग 'मेरे गली मे ' ,ते यात रिक्रिएट केलंय ,ते तर मस्तच आहे आणि शेवटचं 'अपना टाइम आयेगा' पण भारीय.
काही काही सीन्स फार मस्त जमलेत. रणवीरचा एंट्री सीन ,तो ड्रॉयव्हर म्हणून एका गाडीत बसून राहिलेला आहे आणि त्या गाडीवर बाजूच्या बिल्डींगच्या रोषणाईचे लाईट्स पडलेत ,तो सीन. 'एक रेट्रो स्टाईलचं स्लो सॉंग आहे ,'जीने में आये मजा ' ते ऐकायला आणि त्याचं चित्रीकरण पण फार छान आहे.

************************
चित्रपटाच्या धाग्यावर पोस्ट टाकत होते ,पण लिहिता लिहिता फार मोठी झाली पोस्ट ,म्हणून धागा काढला :) रिव्ह्यू नाहीय ,फक्त चित्रपट पाहिल्यावरच्या ताज्या फिलिंग्ज आहेत

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle