फुकेत म्हणजे टिपिकल बीच डेस्टिनेशन. समुद्र किनार्यावर करायच्या सर्व गोष्टी करता येतातच. शिवाय साहसी खेळ पण आहेत उत्साही व तरूण लोकांसाठी. मग बांगला स्ट्रीट वर रात्री फिरणे, हूटर्स बार बाहेरून बघणे. पोल डा ण्स करणार्या सुंदर तरुणी, १८ प्लस शोज , सर्व प्रका रची खरेदी: पर्सेस, ज्वेलरी , टी शर्ट्स ह्याव अन त्याव ... पायाचे तुकडे पडे परेन्त चालणे फिरणॅ र
रात्री तीन परेन्त बीच वर गप्पा मारत बसणे, हे ही करता येते. हर प्रकारचे उत्तम जेवण, रसरशीत फळे, रस्त्या वरचे टिप्पीकल थाई फूड पण उपलब्ध आहे. एकं दरित जिवाची धमाल.
हे सर्व करून झाल्यावर जेव्हा चेरी ऑन द केक म्हणून फुकेत फँटसी लॅ़ड साठी एक संध्याकाळ नक्की राखून ठेवा. एक अतिशय सुखद मजेशीर व चमत्कृती पूर्ण अनुभव. बायका व मुले ह्या गृप साठी तर मस्ट व मस्त अनुभव आहे. कुटुंबासाठी ज्येनांसाठी एकदम बेस्ट अॅक्टिवीटी.
ह्याचे ड्रेस कोड सेमी फॉर्मल किंवा स्मार्ट क्याजुअल. दिवसभर चिंधोट्यामाफिक स्विम सूट घालून फिरल्यावर जरा नटून मुरडायला छान वाट्ते. आत खूप शोज संध्याकाळी साडेसात पासून सुरू होतात. मेन शो एलिफंट्स थिएटर मध्ये रात्री नौ ला असतो. ह्या सर्वांसाठी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फँटसी लँड ला पोहो चा. ह्याचे तिकीट व आतील शो चे रिझर्वेशन आधी करता येते. हे जास्त सुखद पडते. तिथे गेल्यावर राजकन्येसारखे नुसते बाग् डायचे, सेल्फी घ्यायचे व फँसी डिनर करून शो बघायचा. लिल बिट फॉर्मल इव्हिनिन्ग. कंपेअर्ड टू रेस्ट ओफ फुकेत
तिकीट घेतलयवर एंट्रन्स ला त्यातील एक पट्टी ज्यात आपले डिनर टेबल रिझर्वेशन व थिएटर मधील सीट आपल्या छातीवर चिकटवतात. ह्याचा मला फार उपयोग झाला. प्लस डिनर कुपन व शो तिकेट हे बरोबर ठेवायचे. शो मध्ये फोन कॅमेरा अलाउड नाही. बाहेर ठेवावा लागतो.
पूर्ण जागा एखाद्या फँटसी सारखी डेकोरेट केलेली आहे. मुलांना आव्ड तील अशी रचना आहे व
जोकर्स इथे तिथे हिंडत असतात. ( थाई जोकरचा ड्रेस) आत गेल्यावर लेफ्ट ला रेस्ट रूम्स आहेत. आपण पटाँग बीच पासून आलो तर ९ किमी अंतर आहे साधारण अर्धा तास लागतो बसने.
आत इथे तिथे आर्ट फुली विखुरलेली छोटी छोटी दुकाने जशी फन फेअर मध्ये असतात तशी आहेत.
थाई हेंडि क्राफ्ट, खेळणी, बाळांचे कपडे(स्पायड् र मॅण सूट, मरमेड ड्रेस, बॅले टूटू असले क्युट प्रकार. आज बाळांचे लाड करायचाच दिवस आहे तर ते म्हणतील ते घेउन द्या . शिंपल्यांचे दागिने, लोकल प्रकारचे दागिने, कीचेन्स, वॉल हँगिग्न वगिअरे स्टफ आहे. दोन तीन टीशर्ट व इतर कपड्यांची दुकाने, एक दोन थीम एन्काउंटर असलेले मोठे आत जाउन बघाय चे एन्क्लोजरस आहेत. मी काही आत गेले नाही. मुलांसाठी काही काही मजेशीर असे होते.
फन फेअर सारखे गेम्स असलेले स्टॉल आहेत. बसायला खूप जागा, बेंचेस आहेत. सेल्फी पॉइन्ट्स भरपूर आहेत अर्ध्यात एक लक्षरी गूड्स चे दुकान आहे. मी चक्कर मारून आले. उत्तम कपडे,
ज्वेलरी मोत्यांचे दागिने, घरात ठेवायच्य शोभेच्या वस्तू घड्याळे इ. आहे. बारके चायनीज झोडिअॅक चे क्रिस्स्टल वर्क मध्ये पुतळे केलेले होते. त्यात नेमके यिअर ऑफ रॅबिट नव्हते. लेकीला घेतले असते. ड्रेगन होता ( माझे बर्थ ईअर) पण घ्यायची हिम्मत झाली नाही . नो क्लटर पॉलिसी यु नो. हे दाखवणारा वयस्कर चायनीज माणूस लक्षात राहिला. ह्या वस्तूंची क्वालिटी खरेच सुरेख आहे.
वर्ल्ड क्लास.
सर्व बघून आपण गोल्डन किन्नरीज रेस्टॉरेंट कडे येतो. ह्याच्या समोर एलिफंट्स थिएटर आहे.
त्याबद्दल पुढील भागात.
क्रमशः