मुख मेळेविण।पिल्लांचे पोषण।।ज्ञा.
किंवा
कासवांच्या पिल्लांना।दृष्टी होय पान्हा।।
जन्मतःच मेंदूत दिशादर्शक बसवलेले स्थलांतर करणारे पक्षी आहेत तसेच अनेक सजीव आहेत.
पण इथेतर चक्क पिल्लांना जन्म देण्यासाठी समुद्री कासवी सागरी प्रवास करून येते मंडणगड तालुक्याच्या 'वेळास समुद्र किनारी'.
सह्याद्रीच्या कुशीत तीन डोंगरांच्या कवेत वसलेले वेळास हे चिमुकले गाव आता प्रकाशात आलेय ते 'ऑलिव्ह रिडले ' या समुद्री कासवांच्या प्रजाती च्या प्रजनन व संवर्धन सोहळ्यासाठी.
हो एक नैसर्गिक अद्भुत घटनेचा सोहळाच.
फक्त इथे मानवी हस्तक्षेप एका सजग पर्यावरणीय पालकाचा.
कोकणाला लाभलेला निसर्गरम्य विस्तीर्ण किनारा निवडते कासवी !
साधारण थँडीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवी किनाऱ्यावर येऊन मऊशार रेतीत दीड फूट खड्डा खणून 100 ते 150 अंडी घालून परतते.साधारण 55 दिवसात त्यातून चिमुकली कासव पिल्ले बाहेर पडतात.आणि लाटांच्या गाजेने कँपने ऐकत तुरुतुरु धावत सुटतात समुद्री आधीवासाकडे.
या सगळ्यात निसर्ग मित्र मदत करतात ते म्हणजे अंडी किंवा पिल्ले मोठ्या प्राण्यांचे भक्षक बनू नयेत म्हणून.
समुद्राची गाज ऐकून व कम्पनांच्या ओढीने ही पिल्ले भरभर आपल्या आधीवासाकडे कोणत्या ओढीने परततात !
किंनार्यावरची सुरुची बने,सूर्याची उगवती सौम्य किरणे,लाटांचे लयबद्ध नृत्य समुद्रावरचा आल्हाद दायक वारा आणि मुख्य सगळ्यांना आईच्या मायेने पोटात घेणारा रत्नाकर त्यांच्या या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार असतात.
दूरवरच्या माडाच्या सुरुच्या बनातील उंच उंच शेंडे त्यांना शेवट पर्यंत 'टाटा'करत असतात.
रश्मी भागवत।।
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle