गुढीपाडव्याच्या मेनुवरिल धाग्यात काल आमरस, आम्रखंड याचे फोटो आले, आणि सहाजिकच गाडे आंबा या आवडत्या विषयाकडे वळली. तीच गाडी देवगड आंबा, रत्नागिरी आंबा अशी स्टेशनं पार करुन हापुस आंब्याचा जी आय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशनच्या स्टेशनवर पोचली. मग त्या धाग्यावर जिऑग्राफिकल इंडिकेशन हा काहीच्या काही अवांतर टॉपिक सुरु झाला म्हणुन हा धागा.
जिऑग्राफिकल इंडिकेशनची म्हणजे हे नाव जसं सुचवतं त्याप्रमाणे, एखाद्या गोष्टीला त्याच्या भौगोलीक स्थानामुळे मिळणारा विशिष्ठ दर्जा.
अनेकवेळेला भौगोलीक परिस्थितीमुळे एखाद्या निसर्गावर अवलंबुन असणारा घटकात थोडेसे वेगळे गुणधर्म आढळून येतात. त्याची चव, वास्,फ्लेवर, स्ट्रक्चर हे थोडस वेगळं दिसुन येतं. इथे वेगळा म्हणजे चांगला/ वाइट असं अभिप्रेत नाहिये.
त्या ठिकाणची माती, मातीत असणारे वेगवेगळे जीव-जंतू, पाणी, हवामान, तापमान, तिथली आद्र्ता अशा घटकांचा परिणाम पिकांवर, दुधावर, जनावरांच्या मासावर होत असतो.
आणि म्हणुनच अशा प्रॉडक्टला जी आय चा दर्जा दिला जातो. जि आय मिळण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्या प्रॉडक्टस्ना जी आय मिळाला आहे, तो प्रॉडक्ट त्याच स्पेसिफिक स्थानावरुन आला असण्याची खात्री, आणि म्हणुनच चवीची खात्री.
ह्याचं सगळ्यांना माहित असलेल उदाहरण म्हणजे शँपेन. फ्रान्सच्या शँपेन भागात सोडुन जगात कुठेही होणार्या स्पार्कलिंग वाइनला शँपेन हे नाव देता येत नाही. तीच गत फेटा चीज, स्कॉच, दार्जिलिंग चहा आणि आप्ल्या लाडक्या हापुस आंब्याची.
हापुस आंब्याच्या बाबतीत प्रश्ण असा निर्माण झाला होता की देवगड हापुस आणि रत्नागिरी हापुस असे दोन जी आय मिळायला हवे का एकच कोकण हापुस असा एकत्रीत जी आय मिळायला हवा. बरीच वर्ष खर्ची गेल्यावर आता शेवटी कोकण हापुस असा एकत्रित जी आय मिळाला आहे.
त्यामुळे आता बाजारत जर हापुस आंबा दिसला तर कोकणातुनच आला असेल अशी खात्री बाळगायला हरकत नसावी.
महाराष्ट्राचे जी आय
१) सोलापुरी चादर
२) सोलापुरी टॉवेल
३) पुणेरी पगडी
४) नाशिक वाईन
५) पैठणी
६) महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
७) नाशिक द्राक्ष
८) नागपुरची संत्री (हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला मिळुन आहे)
९) आजरा घनसाळ तांदुळ
१०) मंगळवेढा ज्वारी
११) सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकम
१२) वाघ्या घेवडा
१३) नवपुर तुर डाळ
१४) वेंगुर्ला काजु
१५) लासलगाव कांदा
१६) सांगली बेदाणे
१७) बीड सिताफळ
१८) जालना स्वीट ऑरेंज (स्वीट ऑरेंज म्हणजे नक्की कोणत फळ?)
१९) वाई हळद
२०) पुरंदर अंजिर
२१) जळगाव भरताची वांगी
२२) सोलापुरी डाळिंब
२३) भिवापुर मिरची
२४) आंबेमोहर तांदुळ
२५) डहाणु-घोलवड चिक्कू
२६) जळगाव केळी
२७) मराठवाडा केसर आंबा
२८) हापुस आंबा
२९) कोल्हापुरी चप्पल (हा जी आय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना मिळुन आहे)
http://www.ipindia.nic.in/writereaddata/Portal/Images/pdf/Registered_GI_...
इथे भारतात रजिस्टर झालेले सगळे जी आय मिळतील.
(मी जरी बौद्धिक संपदेच्या (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) क्षेत्रात काम करत असले, तरी जी आय हा माझा प्रमुख विषय नाहिये, त्यात बर्याच वर्षापुर्वी थोडसच काय ते काम केलय त्यामुळे जाण्कारांनी चुका असतील तर सांगाव्यात आणि अर्थातच भर घालावी.)
Attachment | माप |
---|---|
gi checklist revised 17022019.pdf | 329.04 KB |