मुव्ही चं समीक्षण वगैरे हा माझा प्रांत नाही...तरी पण मी अनु च्या सांगण्यावरून मी हा प्रयत्न करणारे...
या मुव्ही ची बेसलाईन थोडक्यात सांगायची म्हणजे," अशी जागा जिथे प्रेतं चालू लागतात" A PLACE, WHERE DEAD STARTS WALKING
आहे ना भयानक???
तर बोस्टन वरून एक लहान गावात डॉक्टर लुई आपली पत्नी रेचेल, मुलगी एली , लहान मुलगा गेज आणि एक मांजर चर्च सोबत रिलोकेट होतो. ( सुरुवातीचा अर्धा तास माझा मिस झाला. का ते विचारू नका )
अर्थात फार काही नुकसान झालं नाही....
तर, त्यांच्या घरासमोर जेड नावाचा एक विक्षिप्त म्हातारा एकटा च राहत असतो....
रेचेल चं मत या म्हाताऱ्या जेड ला पाहून काही फारसं बरं होत नाही..
( ही लोकं नेहमी मोठ्या मोठ्या घरात आणि निर्जन प्रदेशातील एकलकोंड्या जागेत का राहतात कोण जाणे )लुई चं कुटुंब घर वगैरे लावून स्थिरस्थावर होत च असतं...
एक दिवस एली घरापाठी असलेल्या पेट सेमिटरी मध्ये खेळता खेळता जाते...ती जागा अतिशय गूढ आणि एकाकी असते. सनलाईट तिकडे ना के बराबर असतो....आणि त्या सेमिटरी मध्ये एक अतिशय अनयुजुअल असं काहीतरी असतं.. एक मेलेलं झाड, त्याच्या अगणित मुळ्यांसकट आडवं झालेलं असतं की तसंच काहीसं
... पलीकडे जायचं म्हणजे त्या आडव्या आडव्या फळकुटांवर चढून च जायचं!
तर एली खेळता खेळता जाते तिकडे, आणि नेमकी त्या आडव्या फळकुटांवर च चढू लागते...इतक्यात म्हातारा शेजारी जेड तिकडे येतो आणि तिला रोखतो... रेचेल शी ही बोलून घेतो की हिला पाठवू नका वगैरे.....रेचेल च मत बदलते.....
एली ला मृत्यू ही संकल्पना नवीन असते. तिला ते नेमकं कसं समजवायचं हे त्या नवरा बायको ला कळत नाही. मृत्यू हा साधा सोपा नसून तो फक्त दुःख देणारा असतो हे त्या लहान जीवाला कळत नाही.
रेचेल च्या मनात ही मृत्यू विषयी असंच काहीसं भय असतं. तिच्या अपंग बहिणीच्या मृत्यू ला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तीच जबाबदार आहे हेच तिच्या मनाने घेतलं असतं. यातून ती बाहेर पडू च शकत नसते.
आता एली त्या जेड ची मैत्रीण बनते. जेड लुई रेचेल च्या कुटुंबात मिसळून जातो...
एक दिवस फार वेगळी गोष्ट लुई बरोबर घडते.
एका मुलाचा भयंकर अपघात होतो आणि लुई त्याला वाचवायची पराकाष्ठा करतो पण तो मुलगा वाचत नाही...
रात्री लुई ला तो मुलगा दिसतो आणि त्याला त्याच सिमीटरी मध्ये घेऊन जाताना सांगतो," तू मला वाचवायचा प्रयत्न केलास, आता मी तुला वाचवणार...त्या वूड्स मध्ये जाऊ नको"
लुई ला काही च कळत नाही. मात्र त्याचे पाय उठल्यावर मातीने भरलेले त्याला आढळतात.
एके दिवशी चर्च ला एक भला मोठा ट्रक उडवून जातो. चर्च हे एली चं खूप आवडतं मांजर असल्याने जेड त्याला नेमका त्याच वूड्स मध्ये घेऊन जातो.
लुई त्या मेलेल्या मुलाने वूड्स च्या बाबतीत दिलेला इशारा विसरतो आणि वूड्स च्या पलीकडे असलेल्या एक टेकडी वर नेऊन जेड च्या सांगण्याप्रमाणे मांजराला पुरतो.
सकाळी एली दोघांना सांगते,"चर्च तर रात्रभर इकडे खिडकीत बसून होता"
रेचेल घाबरते.
जिवंत होऊन आलेला चर्च वेगळा असतो. तो अग्रेसीव झालेला असतो, त्याचे केस निस्तेज आणि राठ झालेले असतात, तो ज्याला त्याला चावत सुटत असतो...एलिलाही भीती वाटत असते त्याची.
लुई हे काय प्रकरण आहे असं जेड ला विचारतो, तेव्हा जेड त्याला या जागेबद्दल सांगतो. "तिथे पुरलेली प्रेतं चालतात, बोलतात पण ती माणसं नसतात तर त्यांच्यात एक पाशवी शक्ती असते"असं तो त्याला सांगतो, "पण ह्या मांजराबाबत असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं" हे ही सांगतो....जेड ने भूतकाळात केलेली चूक आणि आता केलेली चूक त्यांना महागात पडणार च असते!
लुई त्या मांजराला लाम्ब जंगलात सोडून येतो.
त्या रात्री त्याला तो मेलेला मुलगा परत स्वप्नात दिसतो आणि एक सुसाट अंगावर येणारा ट्रक ही!
दुसऱ्या दिवशी एली चा ब डे असतो. एली ला चर्च दिसतो आणि एली त्याच्या मागे जाते रोड वर आणि नेमका गेज खेळता ही तिच्या मागे जातो...
एक सुसाट ट्रक तिथून जात असतो आणि त्या चालकाचं लक्ष फोन मध्ये असतं. लुई धावत जाऊन गेज ला वाचवतो आणि ट्रक चालकाचा ताबा सुटतो....गेज वाचतो!
पण एली?????
एली चे अंतिम संस्कार झाल्यावर रेचेल आणि गेज हे रेचेल च्या आई वडिलांकडे थोडे दिवस जातात......
लुई पार तुटून गेलेला असतो....
आणि त्याला जेड चे तेच शब्द आठवत असतात,"where dead starts walking"
जेड ला तो खूप दारू आणि औषध पाजून झोपवतो आणि त्याच्याकडे असलेलं एकमेव फावड घेऊन एली ला कबर मधून काढून त्या टेकडी वर जातो.....खड्यात पुरून तोंडावर माती सरकवताना तो तिला सॉरी बोलतो....या वेळी त्याच्यातला एक अगतिक बाप जो परिस्थिती ने अविचारी होतो हे जाणवून येतं.
मानसिक रित्या थकलेला लुई घरी येतो तेव्हा त्याला दरवाजा बाहेर पायाचे ठसे दिसतात...पण तो येऊन झोपतो... त्याच रात्री एली येते......
तिला जिवंत पाहून तो इतका खुश होतो, पण ती???? ती तर अंतर्बाह्य बदलून गेलेली असते....तिच्या चेहऱ्यावर प्रेम आनंद असं काहीच नसतं...... लुई तिला बाथटब मध्ये अंघोळीला बसवतो...प्रेमाने तिचे केस ब्रश करू लागतो, पण तिचे केस भयानक रित्या राठ झालेले असतात. तिच्या डोक्याच्या मागच्या भागात पोस्ट मोर्टम करताना घातलेले भयानक टाके तसेच असतात......दुसऱ्या दिवशी ती तिचा आवडता डान्स करत असताना पाहून लुई ला भरून येतं... आपला निर्णय चुकला नाही हे मनात येण्यापूर्वी च एली नाचता नाचता आजूबाजूच्या वस्तू फोडून टाकायला चालू करते, तिच्या चेहऱ्यावर हिंस्त्र भाव असतात.....
हे काहीतरी। विचित्र आहे असा विचार लुई करत असताना जेड येऊन डोकावून जातो, लुई त्याला घरात घेत नाही...तेव्हा "रेचेल इकडे येतेय,तू फोन उचलत नाहीस म्हणून तिने मला इकडे पाठवलं" असं जेड सांगतो......
लुई त्याला कटवतो...पण एली मात्र अजून अजून हिंस्त्र होत चाललेली असते......
जेड घरी आल्यावर एली त्याच्यासमोर येऊन त्याच्यावर हल्ला करायला चालू करते.
जेड तडफडत असताना, ती त्याच्या बायकोचा चेहरा घेऊन त्याला सांगते," हे सर्व तू चालू केल पुन्हा...तुला परिणाम ठाऊक असून तू या कुटुंबाला यात ढकललं आहेस"
इकडे रेचेल घरी येते. आणि एली ला पाहून ती फ्रीज होते..... तिला आनंद तर होत नाही च पण " तू माझी मुलगी नव्हेच" असं म्हणून ती निघून जाते.
इकडे चिडलेली एली गेज आणि रेचेल वर हमला करते. कसंबसं रेचेल लहानग्या गेज ला लुई कडे देऊन निघून जायला सांगते पण एली तिला मारून टाकते....आणि परत त्या टेकडी वर तिला नेऊन पुरते....इकडे लुई गेज ला गाडीत बसवून आणि काचा बंद करून एली ला पकडून मारायला जातो पण या माय लेकीं मिळून त्याला मारतात आणि तिथेच पुरतात........
आणि आता हे तिघे घरही जाळून टाकतात , आणि गाडीकडे मोर्चा वळवतात....चर्च गाडीच्या बोनेट वर बसून असतं आणि गाडीतला
लहानगा गेज आपल्या कुटुंबाला आपल्याकडे एकत्र येताना पाहून मजेत खुशीने हसत बसलेला असतो.......
--------------------------------------------------
हे सर्व कलाकार मला तरी नवीन आहेत...लुई ला कुठल्यातरी मुव्ही मध्ये पाहिल्यासारखं वाटलं. बाकी सर्वांनी acting मस्त केलीय....विशेषतः रेचेल ने !
अपंग , पाठीला बाक आलेली , हातपाय वाकडे झालेली बहीण, जी भीतीदायक आवाजात हाक मारते , अश्या बहिणीला अवोईड करण्यासाठी 10 वर्षाची रेचेल काय करते किंवा त्या बहिणीचा घरातल्या किचन लिफ्ट मध्ये अपघाती मृत्यू झाल्यावर रात्रभर घाबरून ती तिथेच बसून राहते....... बहिणीला आपण लिफ्ट ने जेवण वर न पाठवता स्वतः जाऊन दिलं असतं तर तिचं असं झालं नसतं ही बोच तिच्या मनात कायम असते....आणि एली तिला मारताना हे तिला सूनवुन च मारते.....
हे सर्व भाव , अगतिकता, दुःख ,अपराधीपण रेचेल ने मस्त दाखवलं आहे......
एवढीशी नकटी एली , पण तिने ही आनंदी, हसरी , खेळकर एली ते हिंस्त्र, रागीट, पाशवी एली हा प्रवास मस्त दाखवला आहे......
जुन्या मुव्ही मध्ये 3 जणांचं कुटुंब दाखवलं आहे...स्टोरी 90% सेम च!
( मी पूर्ण स्टोरी च सांगितली आहे. पण काही गोष्टींसाठी किंवा वेळ जात नसेल तर हा मुव्ही बघाच ..... आणि अस्थानी असेल तर धागा उडवला तरी चालेल)