रातांब्याचं पन्ह: ( कोकम चं पन्ह)
साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.
कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या. दोन भाग करून आतला गर बियांसह काढून घ्या.( सालींचे कोकमसरबत करता येते.) गर मोजून त्याच्या दुप्पट गूळ आणि चवीनुसार मीठ मिसळून गर अर्धा तास झाकून ठेवा
,गूळ पूर्ण विरघळला की त्यात जीरेपूड आणि वाटलेली मिरची घालून मिश्रण गाळून घ्या. मिश्रणाच्या चौपट पाणी लागते.
चव बघून लागल्यास मीठ घाला. तयार पन्हं थंडगार करून सर्व्ह करा.
माझ्या माहेरी पाडव्याला गावच्या देवळात सर्व गावकरी एकत्र जमून वसंत पूजा करतात. गणपतीची पूजा करून नवीन पंचांगाचे वाचन करतात. त्यावेळी नैवेद्याला आंबेडाळ आणि रातांब्याचं पन्हं असा नैवेद्य असतो. नंतर आलेल्या सर्वाना डाळ आणि पन्हं वाटलं जातं.