बंध- कलिंदनंदिनी वृत्त

बंध

कलिंदनंदिनी वृत्तः लगालगा लगालगा लगालगा लगालगा

अनाद आर्त साद ही, कशास आत्म ध्यास हा,
न मन पुरे न जन पुरे, कसा पुरेल श्वास हा?

नभात खेळ रंगतो, धरा तुझीच बावरी,
अचूक पेरशी कसा, चराचरात भास हा?

अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच भाळते,
अरूप रूप देखण्या, अथांग रे प्रयास हा

अदेहदेहि धारणे, तुझ्या क्रिडा युगंधरा!
तुझेच नाम जोडता, अतूट हो समास हा!

नकोच ही अलौकिके, नकोत बंध पाश ही,
अमोघ प्रीत 'मल्लिका', न बंध- बंध खास हा!

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle