लॉस एन्जलिस - एक अनुभव भाग -३

सकाळी ६:३० ला हॉलिडे इन च्या रिसेप्शन लाउंज समोरच्या ब्रेकफास्ट हॉलमध्ये जाऊन कोर्नफ़्लेक्स+ दूध ,ब्रेड +बटर,सफरचंद आणि वाफाळलेली गरम कॉफी घेतले .त्यानंतर लगेच उबरने सेन डी यागो रेल्वे स्टेशन ला पोहोचलो.आमची ट्रेन १ १/२ तासांनी होती. त्यामुळे स्टेशनच्या मुख्य वेटींगरूम मध्ये बसलो.जुन्या बांधणीची इमारत आहे
waiting room.jpg
Waiting Room -2.jpg

एक मोठा लांबलचक हॉल. त्यामध्ये एकीकडे तिकीट काउंटर च्या तीन खिडक्या पण त्यातली एकच उघडली होती. तिथे रेल्वे युनिफोर्म घातलेली एकच मेडम तिकीट देणे, प्रवाशांना माहिती पुरवणे आणि येणाऱ्या –जाणाऱ्या गाड्यांची उदघोषणा करणे अशी कामे एकसाथ करत होती. हॉल च्या मधल्या भागात पाठीला पाठ अशा बाकड्यांच्या दोन ओळी होत्या.प्रवासी तिथेच विसावत होते कारण बाहेर प्लेटफोर्म वर थंड वारे वाहात होते.एका बाजुला कोपऱ्यात लहानसे कॉफी-शॉप तर दुसऱ्या कोपर्यात एक बंद बुक स्टोल होता.त्या बुक स्टोल बाहेर एका लाकडी स्टेंड च्या लहान लहान खणा मध्ये सेन डी यागो शहरातील याशहराची,प्रेक्षणीय स्थळे,हॉटेल्स,नकाशा इत्यादी माहिती देणारी लहान लहान बुक लेट्स प्रवाशांच्या सोयीसाठी रचून ठेवली होती. चार ठिकाणी मोठे डस्ट बीन ओल्या-सुक्या कचऱ्यासाठी ठेवले होते.एक कर्मचारी बाई तिची स्वच्छता सामानाची ढकल गाडी घेउन तिचे कार्य करीत होती.प्रत्येक उदघोषणे नंतर वाजणारी घंटा नकळत माझ्या मनाला भूतकाळात घेऊन गेली.माझे टाईम-पास निरीक्षण चालू होते. तेवढ्यात राहुल स्टेशन बाहेर फेरफटका मारून आला.येताना गूगल कृपेने एका रेस्टारेंट मधून ताजे सेंड विच आणि गरम डोनट घेऊन आला.बऱ्याच वर्षांपूर्वी भारतात लांबच्या रेल्वे प्रवासात एखाद्या जंक्शन ला जास्त वेळ स्टोप असल्यावर स्टेशन बाहेरुन गरम भजी,सामोसे आणायचे ती आठवण झाली.
इतक्यात आमच्या गाडीची उदघोषणा झाली .समोरच्या प्लेट फॉर्म वर असलेल्या एका निळ्या बोर्ड जवळ मंथली पास वाल्यांनी एका रांगेत व इतर तिकीट धारी नी दुसऱ्या रांगेत उभे रहा .
df9402fd-5837-4fe3-b7a1-2e65502e2e0c.JPG
आमची ट्रेन मधल्या प्लेट फॉर्म वर उभी होती. एकूण ३ किंवा ४ डब्यांची ट्रेन असते.रूळ जमिनी लागत असतात. पहिल्या प्लेट फॉर्म वर सेन डी यागो शहराच्या वेगवेगळ्या भागात जाणार्या ट्रेन्स जा-ये करतात. ट्रेन च्या दोन्ही बाजूला इंजिन असते आपल्या इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सारखीच दारांची आपोआप उघडझाप होणारी आणि फारशी गर्दी नसणारी ट्रेन . आमच्या ट्रेन ची वेळ झाल्यावर एका कर्मचारी बाईने आधी मंथली पास वाल्यांना पहिल्या डब्यात व आम्हा उरलेल्यांना बाकी दोन डब्यात बसायला सांगितले.. ही गाडी डबल डेकर होती.पहिल्या रिझर्व डब्यात प्रवाशांच्या सीट रिझर्व असतात आणि त्यांना त्यांच्या सीटवर ड्रिंक्स देण्यात येतात . अर्थात त्याचे चार्जेस आगाऊ तिकिटाबरोबर घेण्यात येतात .बाकी दोन डबे इंटर कनेक्टेड असून खालील भागात एक लहानसे अद्ययावत केंटीन होते. तिथे गरम कॉफी बरोबर बर्गर,डोनट मायक्रोवेव्ह करून देत होते. आम्ही समुद्राकाठाचा अंदाज घेउन ,फोटो काढण्याच्या दृष्टीने,खिडकी जवळच्या एकामागे एक असलेल्या सीट्स घेतल्या. सन फ्रांसिस्को च्या ३ तासांच्या प्रवासाला सुरुवात मस्त झाली .थोड्याच वेळात तिकीट चेकर ने तिकीट चेक केले व प्रत्येक प्रवासी बसलेल्या सीटवर, सामान ठेवायच्या जागेत असलेल्या खोबणीत तिकीट चेक केल्याचा एक हिरवा टेग अडकवला.हे पुढच्या तिकीट चेकर साठी असावे. ह्या प्रवासात साधारण ५-६ स्टोपेज प्रत्येकी४-५ मिनिटांचे होते.बर्यापैकी प्रवासी वाढत होते.
आमच्या उजव्या बाजूला फर्लांगभर अंतरावर समुद्रकिनारा दिसू लागला.

मी मोबाईल इअर फोन वर कौशिकी चक्रवर्ती शुद्ध सारंग ऐकायला सुरुवात केली .गाडीचे रूळ आणि समुद्रकिनारा समांतर होता .सकाळची थंड वेळ, कोवळे ऊन होते सूर्य आणि ढगांची लपाछपी चालू असल्याने आकाशात निळा-पांढरा-लाल-गुलाबी रंगांची उधळण दिसत होती.समुद्राला भरती होती. त्यामुळे लांबवरून एकामागे एक येणार्या चमचमणार्या लाटा मन मोहून टाकत होत्या.एकदा तर लांबवर इंद्रधनू ही दिसले. क्षितिजापर्यंत दूरवर रुपेरी समुद्र दिसत होता .काही सुरक्षित ठिकाणी बोटींग,राफ्टींग ,फिशिंग साठी सोयी केल्या होत्या.तिथे मोटेल्स ,लहान कॉटेजेस ची सोय दिसत होती .तर काही जागी उत्साही पर्यटक आपली रहाण्याची सोय असलेले ट्रक घेउन आलेले दिसले.कापडी टेंट ही लावलेले दिसले. जमेल तेव्हा ,सुट्टीचा फायदा घेउन पर्यटनाला निघालेले प्रवासी इथे दिसले.

आम्ही साधारण ११:३० वाजता लॉस एंजलीसला पोहोचलो. इथली मुख्य बिल्डींग जुन्या घडण-जडण ची होती .पण एकूण स्टेशन आकारमानात मोठे आहे. ट्रेन मध्ये सेंडविच-डोन ट खाल्याने भूक नव्हती.त्यामुळे आम्ही उबरने शहरी भागातल्या Hancock Park मध्ये La Brea Tar Pits म्युझियम पहायला गेलो.

इथे हजारो वर्षांपूर्वीचे नैसर्गिक आणि अजूनही जिवंत असलेले खनिज तेल व कोल तर मिश्रीत बुडबुडे येणारे पिट्स /चर दिसतात.तिकीट घेतल्यावर सर्वप्रथम ह्या म्युझियम ची माहिती देणारी एक तासाची फिल्म पाहिली.कधीकाळी येथे हिरवळ आणि हिमा च्छादित पर्वत होते. बरेच प्राणी-पक्षी जीवनयापन करीत होते. काही वर्षानंतर निसर्ग-नियमा प्रमाणे भूगर्भातील बदल,ग्लोबल वोर्मिगमुळे बर्फ वितळला ,पर्वत नाहीसे झाले,भूगर्भातून लावा निघाला .निसर्गातील बदलामुळे पशु-प्राण्यांना अन्न पाणी मिळणे दुर्लभ झाले.मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊ लागले. तर शिकार करण्यात ,हिंडणे-फिरण्यातअसमर्थ असलेले कित्येक मोठे,उंच प्राणी असहाय होवून मेले. जमीनीखाली गाडले गेले. कालांतराने त्यावर दगड-मातीचे कित्येक थर निर्माण झाले.निसर्ग नियमानुसार पुन्हा काही शेकडो वर्षांनी पुन्हा हिरवळ निर्माण झाली.सजीवांना पोषक वातावरण निर्माण झाले .रासायनिक बदलामुळे भूगर्भात खनिज तेल आणि खनिज निर्माण झाले.तेव्हा मानव खनिज तेलाचा वापर करत होता .थंडी ,पावसापासून रक्षण करण्यासाठी आपल्या घराच्या छतावर “कोल टार/डांबर “वापरत होत्यामुळे भूगर्भातील साठा शोधताना ह्या भूभागात ज्या ज्या ठिकाणी खोदकाम झाले तिथे प्राण्यांचे अवशेष हाडा च्या रुपात सापडले. खोदाकामाचे हे पिट्स अजूनही जिवंत आहेत.त्यातून खनिज तेला बरोबर कोल टार बुडबुड्यांच्या स्वरुपात निघताना दिसतात.तवंग साचलेला दिसतो . तसेच त्या भागात सगळीकडे पेट्रोल,डांबराचा वास येतो.म्युझियम च्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच एक असे टार पिट दिसते. म्युझियम च्या मागील भागात अजूनही खोदकाम चालू आहे तिथे प्राण्यांच्या हाडा.चे सापळे व अवशेष सापडत आहेत. ह्या म्युझियम च्या दर्शनी भागातल्या रिसेप्शन काउंटर मागे काचेच्या भिंती मागे मोठी प्रयोगशाळा वसवली आहे. ह्या विषयातले तज्ञ तिथे इथे सापडलेल्या अवशेषांचे संशोधन करताना दिसतात. एका मोठ्या हॉल मध्ये लहान मोठ्या चित्रांद्वारे हा समग्र इतिहास स्पष्ट केला आहे.तर दुसरीकडे विशालकाय सुळे,कान,सोंड आणि धड असलेल्या हत्तीचा सांगाडा ठेवला आहे. त्याशिवाय आणखी काही हत्ती,अस्वल,डायनासोर व पक्षांचे सांगाडे जतन करून ठेवले आहेंत.
Elephant-6

Strucure-7
Elephant.jpg

ह्या म्युझियम जवळ अमेरिकेतील सर्वात मोठे असे –दोन जोड बिल्डींग मध्ये सामावलेले आर्ट आणि सायन्स ऑफ मूव्हीज चे प्राचीन आणि अर्वाचीन काळातली प्रगती दाखवणारे Lacma Museum लेक्मा म्युझियम आहे.ह्या बिल्डींगमध्ये असलेल्या रेस्तारेंट मध्ये कोर्न सूप आणि सेंडविच खाल्ले.
इथून पायी जवळ जवळ २ मैल पायी चालत एल.ए.च्या फारमर्स मार्केट भागात आलो.इथे मोठे शो रूम्स ,खाण्यापिण्याची बरीच दुकाने आहेंत पण सामिष प्रकार जास्त.इथे पाण्याची बाटली व पाइनएप्पल ज्यूस विथ जिंजर घेतला आणि उबर ने हॉलिडे इन हॉटेल ला निघालो. ८ व्या मजल्यावरच्या रूम मधून बाहेरचे दृश्य खूप छान दिसत होते.रूम मध्ये फ्रीज होता मायक्रोवेव्ह,कॉफी मशीन नव्हते आणि मजल्यावरील वेंडिंग मशीन तसेच तळ मजल्यावर असलेल्या रेस्तारेंट मधेही पाण्याची बॉटल नव्हती.बिअर आणि दारवांचे विविध प्रकार होते. बाहेर पाऊस ही पडत होता.अर्धा तास विश्रांती घेवून खाली येऊन जवळच्या पेट्रोल पंप लगत च्या दुकानातून पाण्याच्या बाटल्या घेतल्या.१० मिनिटे पायी चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या मेक्सिकन फूड ट्रक वरून टाको ,कसादिया आणि डाएटकोक पेक करून घेतले ,रूम वर येऊन जेवलो. एल ए .चे मुख्य आकर्षण फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री, युनिव्हर्सल स्टुडीयो, डीस्नेलेन्ड आहे. आम्हाला ह्यापैकी कुठेही जायचे नव्हते. त्यामुळे सकाळी इथला मुक्काम हलविण्याचे ठरविले. इथला एक दिवस पुढे सन फ्रांसिस्को च्या हॉलिडे इन मध्ये वाढवून घेतला .
आता उद्या सकाळी इथून चेक ऑउट करून रेंटल कार हायर करून पुढच्या प्रवासाची सुरुवात करायची होती .ते वर्णन यापुढील भागात .

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle