कम, फॉल इन लव्ह ... २

शिरस्त्याप्रमाणे ६ वाजता wake up call , ७ वाजता break fast , ८ वाजता निघालो!
गणपती बाप्पा मोरया! उंदीर मामा की जय!! चिचुंद्री मामी की जय!! :ड
इटलीतून स्वित्झर्लंडमधल्या लुसर्नचा प्रवास तसा मोठा आहे ५ तासांचा . एव्हाना सगळ्यांची छान ओळख झाली होतीच. त्यामुळे आमच्या गृप लीडरने वेगवेगळे खेळ घेणं सुरू केलं. थोडे ब्रेकिंग द आईस करायला सगळ्यांना आपापल्या आवडत्या हिंदी सिनेमांची नावे सांगायला लावली.. तीसेक नावे जमा झाली.. मग म्हणे, आता मी सांगतो ते वाक्य म्हणून आपण सांगितलेला सिनेमा त्याला जोडून मोठ्याने सांगायचं! वाक्य होतं "लालू की धोती में ... "
झालं!
"लालू की धोती में मैंने प्यार किया !" "लालू की धोती में दंगल!" "लालू की धोती में परमाणू" "लालू की धोती में अकेले हम अकेले तुम!" "लालू की धोती में पॅडमॅन" "लालू की धोती में जबजब फूल खिले" ... एक से एक विनोदी वाक्ये ! सगळी बस हसूनहसून लोटपोट! Lol
मग अर्थात गाण्यांच्या भेंड्या. यातही अट होती, फक्त चाँद, चंद्र, चंदा.. अशी चंद्र असलेली गाणीच हवीत. सुरवातीला सोपं वाटलं तरी ठराविक गाणी झाल्यावर चांगलंच डोकं खाजवावं लागत होतं! "रुक जा रात, ठहर जा रे चंदा.." " मेरे सामनेवाली खिडकी में.." "चांद ने कुछ कहा.. पासून अगदी "चंद्र आहे साक्षीला.. आचंद्र सूर्य नांदो.. आणि चांदोबा चांदोबा भागलास का"... मंडळी मनापासून खड्या आवाजात घसे साफ करून घेत होती! :haahaa:
एवढी मराठी गाणी येताहेत म्हटल्यावर कोणीतरी उत्स्फूर्तपणे "गर्जा महाराष्ट्र माझा ... " सुरू केलं!! फाऊल असला, तरी त्याला दाद देत सगळ्यांनीच ते गाणं उचलून धरलं! अगदी lyrics शोधून सुरात सूर मिळवला.
"सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. " :fadfad:
सगळेच आपापल्यापरीने शब्द चुकवत बेसूर गात असले तरी 'जय जय महाराष्ट्र माझा... " म्हणतांना सगळ्यांच्या मनाचे सूर मात्र छान जुळून आले होते. अंगावर रोमांच, दाटलेला गळा आणि डोळ्यांत पाणी.. जगात कुठेही जा.. काही गोष्टींवर इलाजच नाही!!

लंचच्या वेळी इटलीच्या बॉर्डरवर येऊन पोहोचलो.. इथलं लंच काही खास नव्हतं.. निघालो तर काय? बॉर्डर म्हणजे बस्स, नॉर्मल आपले टोल नाके असतात तश्या चौक्या आणि पोलीस तपासणी ... सहजतेने वहानं इकडून तिकडे जात होती.. दोन बाजूंना दोन्ही देशांचे झेंडे नसते तर देश ओलांडतोय असं वाटलंही नसतं.

swiss

तिथून पुढे मात्र सगळेच बाहेरच्या निसर्गसौंदर्याने निःशब्द झाले होते.. सुंदर सोनसळी उन्हातून, बाहेरच्या हिरवाईमधून बस धावत होती... मधून मधून सागर - गृप लीडर माहिती देत होता.. मधेच बस थांबवली आणि दिसला तो एका सुंदर तळ्याचा नजारा! लेक लुगानो ! शांत स्तब्ध तळं! हिरवं-निळं स्वच्छ पाणी आणि परिसर, काठावर वसलेलं छोटं टुमदार गाव.. सगळीकडेच हिरवाई.. वर निळंभोर आकाश आणि दूरवर बर्फ़ाची टोपी घालून उभा आल्प्स! डोळ्यांत मावत नाही एवढा मोठा कॅनव्हास.. एकूणच तळ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि सगळीकडेच असाच सुंदर देखावा!!

swiss

लुसर्नला ५ च्या सुमारास पोहोचलो.. इथेच आता ३ रात्री राहायचं असल्याने हॉटेल कसं/कुठे आहे उत्सुकता होतीच! रेल्वे स्टेशन जवळचंच झकास हॉटेल पाहूनच हुर्रे झालं! बॅगा टाकून भटकायला बाहेर! अजून २/३ फॅमिलीज पण सोबत आल्या.. पास घेऊन रेल्वेने लेक लुसर्नला पोहोचलो.. सुंदर देखावा आणि सुंदर हवा.. लुसर्न बऱ्यापैकी मोठं शहर आहे. तिथे एवढं सुंदर, मोठ्ठं आणि स्वच्छ राखलेलं तळं, सहज जाता येता विसावायला/ संध्याकाळची हवा खायला सुंदर बाक, कुठे वाटलंच तर पाण्यापर्यंत जायला सुबक पायऱ्या, तिथे जाऊन बसलं तर खाऊच्या आशेने जवळ येणारी धीट बदकं, दोन्ही बाजूंना छोटी छोटी हॉटेल्स/ कॅफे शॉप्स, आईस्क्रीम पार्लर्स असून स्वच्छता.. आणि शांतता ... हे सगळं पाहून तिथे राहण्यार्या लोकांचा हेवाच वाटला! :dd:

swiss
swiss

तळ्याच्या काठाकाठाने, पुलांवरून इकडून तिकडे तिकडून इकडे अशी भरपूर भटकंती केली. जवळच दोन उंच टॉवर्स दिसत होते तिकडे निघालो... Stalwart guard towers & clock tower .. पायऱ्या चढत जसजसं उंचावर जाऊ तसं आजूबाजूच्या टुमदार शहराचा देखावा नजरेत भरत होता..

swiss

वर पोहोचल्यावर तिथून कलणारा सूर्यास्त बघायला खूप मजा आली. मात्र पावसाची भुरभूर सुरु झाली आणि आम्ही परतलो.. चक्क स्वित्झर्लंड! उल्हासित मन - डोळ्यांत फक्त आणि फक्त बर्फ़ाची शुभ्र-धवल स्वप्ने! मंतरलेली रात्र!!

खूप खूप वाट पाहिलेला सहावा दिवस उजाडला - माऊंट टिटलीस! केबल कारने वरवर उंचउंच नेणारा प्रवास .. खाली-वर अवतीभवती बर्फच बर्फ .. लहान मोठी बर्फ़ाच्छादित शिखरे.. बर्फ़ानेच झाकलेली-वाकलेली झाडे.. ढगाळ हवा आणि भुरभूर बर्फ.. कापसासारखे अलगद तरंगत खाली जाणारे स्नो फ्लेक्स.. मध्येच उन्ह पडून शिखरांवर/ खाली बर्फावर दिसणारा किरणांचा मनोरम खेळ! एकदम रोमांचकारक अनुभव! :dhakdhak:

swiss
swiss
swiss

इथे एक गंमत झाली - सुरवातीलाच एक एन्ट्री पास मिळतो, तो परतेपर्यंत सांभाळायचा होता.. म्हणून माझ्या जाकिटात वरच्याच खिशात ठेवायला चेन उघडली, तर अहो आश्चर्यम् !! :surprise: खिशातून तसाच अजून एक पास निघाला - २०१५ चा!!! :thinking: पण रांगेमध्ये गर्दी-गडबडीत विचार करायला वेळच नाही मिळाला..  106 तशीच पुढे निघाले.. वरती जेलाटो आईस्क्रीम ब्रेक झाला तेव्हा 'एक मिस्टरी सॉल्व्ह करायचीय... ' करत तो पास काढला तर काय! आता एक सोडून चक्क दोन पास!! ऑगस्ट २०१५!! :hypno: आता मात्र सगळ्यांनीच नवऱ्याला चिडवायला सुरवात केली "बोला, वाईफच्या नकळत कसे काय आला होतात, मुख्य म्हणजे कोणासोबत आला होतात?!!" मीही ते पास नाचवत त्याची खेचायला लागले.. :ड तेवढ्यात आमचं बाप-कुल-शील रक्षक रत्न पचकलं "अग आई! माई-आजो आले होते नं? त्यांचे असणार!!" फुस्सस... :uhoh: खरेदीला पुरेसा वेळ नसल्याने बाबांचं जाड-गरम जाकीट मी ढापलं होतं, त्यात त्यांचे पास सुरक्षित होते! तिथे त्या आगळ्या गूढ वातावरणाची जादू मनावर असल्याने मला हे अज्जिबात लक्षात आलं नव्हतं! बाबांना हा किस्सा सांगितल्यावर त्यांनीही तत्परतेने त्यांचे २०१५ चे फोटो पाठवून 'हा सूर्य हा जयंद्रथ' करत जावयाचं रक्षण केलं! :ड आता आम्ही cliff walk करताना कठड्याला 'जोडप्याच्या प्रेमाचे आणि अभिन्नतेचे प्रतीक' असलेले कुलूप ठोकायला मोकळे! Lol
आता मात्र बर्फ़ाची ओढ लागली होती.. शाहरुख-काजोलचं मोठं कटआऊट आणि फोटोसाठी सर्ववयीन जोडप्यांची झुंबड! आम्ही मात्र थेट बर्फ़ातच पळालो.. अजून काश्मीरही न घडल्याने बर्फ़ाचं फार्फार अप्रूप होतं! खूप खूप खेळलो तिथे, बर्फगोळ्यांची फेकाफेकी/ घसरणं/ लोळालोळी / उड्या आणि अर्थातच फोटो! आईस फ्लायरचा अनुभव तर अगदी थरारक होता! एवढ्या उंचीवर उघड्या झोपाळ्यातून आकाशात सैर! अगदी पंख फुटून उडत असल्याचाच भास! याचिसाठी केला होता अट्टाहास!! Love तसंच तुफान वाऱ्यात, बर्फ़ाच्या भुरभुर वर्षावात हलत्या पुलावरचा cliff walk!! काकडून निळं व्हायची वेळ आली तेव्हाच आत आलो! बर्फवर्षावामुळे स्नो स्लायडिंग मात्र बंद होते. गरमागरम लंच आणि केबल कारने परत खाली!

swiss

swiss

दोन तास लुसर्न सिटी walk .. shopping साठी फ्री टाईम. संध्याकाळी लेक लुसर्नमध्ये Dinner Cruise! मोठ्या बोटीतून झुलत-डुलत, रमतगमत वाईनचा आस्वाद, गरम जेवण , साथीला लाईव्ह स्वीस फोक म्युझिक.. सकाळपासूनच मी तरंगत होतेच.. Isshh यासगळ्याच्या जादूमुळे की काय, तिथली रेड वाईन मला पहिल्या अर्ध्या ग्लासातच चढल्यासारखी झाली! :P आत्यंतिक खुशीत मला खूपखूप हसू यायला लागलं! Blushing नवरा आणि लेक उगाच टेन्शन मध्ये! खरंतर तसं काही नव्हतं.. पण यांच्या काकुळतीमुळे मला अजूनअजूनच हसू यायला लागलं! :haahaa: म्हटलं, आता मला व्हाईट वाईन टेस्ट करायचीय.. 8) तर नवरा चक्क ठासून 'नको' म्हणाला.. :raag: "हे काय?! कमॉन, प्लीजच.. हे सगळे लोकं परत मला कधीही बघणार नाहीयेत.. मला हवी अजून वाईन" :devil: हे ऐकून मात्र यांची खात्री पटली आणि ते दूर सरकून आपण त्या गावचेच नाही असं भासवू लागले.. पुढचं मला खरंच काही आठवत नाही ! :P :P Isshh
आता शेवटचा सातवा दिवस.. ट्रुमेलबाख ग्लेशियर फॉल्स, कॉगव्हील ट्रेनने युंगफ्राऊ - टॉप ऑफ युरोप! लायन मोनुमेंट, इंटरलाकेन सिटी टूर !
ट्रुमेलबाख ग्लेशियर फॉल्स म्हणजे हिमनदीतून तयार झालेल्या धबधब्यांचे निसर्गाचे आश्चर्य!आणि बोगदे खोदून, पायऱ्या करून ते नीट जवळून अनुभवता यावेत हे मानवनिर्मित आश्चर्य! अंधाऱ्या गुंफांमधून टप्प्या टप्प्याने रोरावत कोसळणारे पाणी, त्याचा घुमणारा आवाज आणि उडणारे थंड तुषार .. निमुळते-ओले-निसरडे जिने.. वरपर्यंत जातांना खाली प्रत्येक टप्प्यावरचे धबधब्याचे वेगळेच रूप दिसते.

swiss

आता स्नो फॉल, -७ टेम्प आणि अगदी टॉप ऑफ युरोपला जायचे म्हणून सावधगिरीच्या सूचना, कापूरवडीचे वाटप आणि विशेषतः काकवा-आज्यांना कमी बोलण्याचे आवाहन! :bigsmile:
कॉगव्हील ट्रेनने युंगफ्राऊचा प्रवास मंत्रमुग्ध करणाराच! एरवी फक्त ग्रीटिंग्ज/ वॉलपेपर/ टीव्हीवर पाहिलेली दृश्ये सभोवताली दिसत होती! काय आणि किती पाहावे/टिपावे?! लहान मोठी शिखरे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे-झुडपे, पठारे, दऱ्या-खोरी .. बर्फ़ाने समभावाने सर्वत्र अंथरलेली चादर .. त्यामुळे तयार झालेले विविध आकार-उकार, वेलांट्या, काने, मात्रा .. सारेच 'शुभ्र काही जीवघेणे .. ' बर्फ़ाचेही कित्ती प्रकार!! कुठे कातळकठीण, कडक अपारदर्शक, कुठे पापुद्रे-पापुद्रयांचा माहिमहलवा अर्धपारदर्शक, कुठे जणू कापसाचा पिंजून ठेवलेला ढीगच.. तर कुठे फांद्या-पानांवरून ओघळतांनाच गोठलेल्या अणुकुचीदार सुयाच सुया! कुठे झुडूपांवर झालरी-झालरींचे झगे.. कुठे जात्यातून सुरुसुरू बाहेर येणारं पीठ.. सुमारे साडेतीन हजार मीटर्स उंचीवरची वेगळीच जादूई दुनिया ! :dd:

swiss
swiss
swiss
swiss

युंगफ्राउला अनेक स्पॉट्स develop केलेत .. सुंदर सुंदर ice sculptures चं दालन, ice palace , Sphinx terrace ... सगळीकडे जाताना दोन्ही बाजूंनी ते सगळं बांधकाम कधी/ कसं झालं, रेल्वेचं काम कधी झालं त्यात सहभागी कामगार वगैरे संबंधी माहितीदर्शक भित्तीफलक/फोटो लावलेत. थेट १८९६ मध्ये सुरु झालं रेल्वे खोदण्याचं काम ... माणसाच्या जिद्दीला आणि प्रयत्नानां सलामच! गरमागरम सूप आणि पावभाजीचं लंच मिळालं. मग आम्ही पळालो Lindt Chocolate factory कडे! तिथे त्या चॉकलेटची निर्मितीप्रकिया, घटक, रॉ मटेरियल, खास ingredients वगैरे माहितीची फिल्म, पुतळे होते.. आणि अर्थात विक्री! फॅक्टरी आउटलेट असल्याने बाहेरच्यापेक्षा जास्ती व्हरायटी आणि किमतीही कमी होत्या! मनसोक्त खरेदी झाली! मग अर्थात मोर्चा सोव्हनीयर्स शॉप्सकडे! निघतांना मिळालेलं गरमागरम हॉट चॉकलेट केवळ स्वर्गीय!

swiss
swiss

खाली आल्यावर एक लायन मोमेंट्म पाहायला नेले. मोठ्या सरळ उभ्या उंच कातळात पाठीत खंजीर खुपसलेला, वेदनांनी आणि विश्वासघाताने पिळवटलेला सिंह कोरलेला आहे. असं म्हणतात, एका स्वीस राजावर फसवून आक्रमण झाले. सैनिक जीवावर उदार होऊन प्राणपणाने सिंहासारखेच लढले. पण विश्वासघाताने त्याचा पराभव झाला. त्याचं हे प्रतीक! सिंहाचे व्याकुळ भाव अस्वस्थ करतात अगदी..

swiss

मग इंटरलाकेन या सुंदर, दोन तलावांमध्ये वसलेल्या शहराची टूर! Ambassador of Interlaken म्हणजे आपले यश चोप्रा !! त्यांचा छान पुतळा आहे तिथे! सुंदर राखलेल्या बागा, कारंजी, विविध प्रकारची फुलं-पानं, रेखीव स्वच्छ रस्ते .. दुनियेतल्या सगळ्याच ब्रँडसची मोठमोठी दुकाने .. कपडे , घड्याळे, कॉस्मेटिक्स ... काय नव्हेच!

swiss
swiss
swiss

इतक्या अविस्मरणीय दिवसानंतर रात्र मात्र जडजड, कातर हळवी .. निरोपाची ..
........
केसरी/वीणा सारखी पॅकेज टूर.. तिचे अनेक कमी-जास्ती, चांगले/वाईट पॉईंट्स असतातच. मला स्वतःला अशी pre-planned, निश्चिन्तता असलेली टूर आवडते. जायचं आणि निम्मा वेळ पुढचं प्लानिंग, तयारी, खर्चाची आकडेमोड, शोधाशोध, प्रासंगिक वादविवाद ( :ड ) करत बसायचं.. नकोच ते! (माहितीए माहितीए.. :nahiiii: आपलं-आपलं नवं काही शोधायचं-भटकायचं-चाखायचं थ्रीलही वेगळंच! :sheepish: ) शिवाय गृप टूर म्हटलं की एक छान नवा कोरा गृप मिळतो - ओळखी करायला, दोस्ती जमवायला.. मिळून धम्माल करायला.. मानवी स्वभावाची नवे नमुने बघता येतात. त्यातही काही महाभाग असतातच मीठ टाकणारे : उशीर करणारे/ किरकिर करणारे/ पुढे पुढे करणारे.. :haahaa2: मग त्यांनाही सिक्रेट नावं देत/ आता ते कसे वागतील/react करतील वगैरे अंदाज बांधत मजा करता येतेच! :haahaa: परत कोण कुठे भेटतं नंतर?! यावेळी तर बऱ्याच गॅपनंतर अशी ट्रिप झाली. एकूणातच आम्हीं मराठी बोलण्याला, मराठी माणसांच्या सहवासाला, मराठी संमेलनात धमाल करायला अगदी आसुसलो होतो.. त्यामुळे अगदी पुरेपूर आनंद घेतला गृप सोशलायझेशनचा सुद्धा!! छान नवीन ओळखी झाल्यात, ज्यांच्याशी गप्पा सुरूच आहेत! Blessed
खरंच, माझ्यातला काही भाग तिथेच सोडून आलेय मी!
ऐ वक़्त रुक जा, थम जा, ठहर जा
वापस ज़रा दौड़ पीछे..
मैं छोड़ आयी, खुद को जहाँ पे
वो रह गया मोड़ पीछे......

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle