मूग डाळीची भजी करण्यासाठी मूग डाळ भिजत घातली होती. भजी करून सुद्धा थोडी डाळ शिल्लक होती. त्याची दुसऱ्या दिवशी कचोरी केली. एकदम मस्त झाली. सगळ्यांना आवडली.
साहित्य :
१ वाटी भिजवलेली मूग डाळ (७-८ तास भिजवून ),
१ चमचा बडीशेप ,
१ वाटी मैदा,
१ चमचा आमचूर पावडर,
फोडणीसाठी जिरे, हळद, हिंग,तिखट,
चवीनुसार मीठ ,
चिंच गुळाची चटणी,चिरलेला कांदा, कोथिंबीर , शेव
कृती:
१. सर्वात आधी मैद्यामध्ये मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा अर्धा .
२. भिजवलेली डाळ भरड वाटून घावी.
३. गरम तेलात जिरे,बडीशेप,हिंग हळद घालून फोडणी करून त्यात तिखट,डाळ,आमचूर पावडर,मीठ घालून वाफ काढून घ्यावी.
४. ह्या सारणाचे कचोरी मध्ये घालण्यासाठी गोळे करायचे आहेत,तसे गोळे होण्यासाठी गरज लागली
तर वाफवताना पाण्याचा हबका मारावा.
५. आता मैद्याची छोटी पारी करून त्यात वरील सारण घालून छोटी कचोरी लाटून घेणे.
६. माध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत कचोऱ्या तळून घ्या.(कचोरी टम्म फुगायला पाहिजे)
७. गार झाल्यावर ह्या कचोरी मध्ये चिंच गुळाची चटणी, शेव, कांदा , कोथिंबीर घालून सर्व्ह करा.