उब्जे
साहित्य — ——
तांदुळाच्या बारीक कण्या १ वाटी
अर्धीवाटी हरभरा डाळ
शेंगदाणे दोन मुठी
नारळाचा चव अर्धीवाटी
फोडणीसाठी तेल व इतर आवश्यक वस्तू
तयारी———
संध्याकाळी करायचे तर
सकाळी कण्या थोड्या भाजून भिजत घालाव्यात.ह.डाळ दोन तास भिजलेली हवी व ती मिक्सित वाटून घ्यावी.
दाणेही भिजत घालून सोलून ठेवावेत
कृती ———
प्रथम जरा जास्त तेलात मोहरी,जिरं, हिरवी मिरची हिंग,हळद,इ.टाकून दाणे व कण्या टाकाव्यात.थोडे परतून थोडे गरम पाणी घालावे. मीठ घालावे काही वेळाने पुन्हा पुन्हा थोडे थोडे गरम पाणी टाकत कण्या शिजू द्याव्यात परंतु कणी मोकळी राहील अशीदक्षता घ्यावी.आता त्यावर वाटलेली डाळ+डाळीपुरेसेमीठ टाकून नीट ढवळून घ्यावे
दोन दणकून वाफा काढाव्या. उब्जे खाण्यासाठी तयार.
बशीत घेतल्यावर त्यावर कोथिबीर ,चव व लिंबाची फोड
अवश्य असावी.वाट न पहाता चविष्ट उब्जे खावेत.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle