आमच्या घरी इनडोअर आणि आउटडोअर रॉक क्लायंबिंगचे फार वेड आहे. नवरा आणि लेक बरेचदा इनडोअर रॉक क्लायम्बिंग जिमला जात असतात. उन्हाळा तर आउटडोअर रॉक क्लायंबिंगचा सीजन. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा बाहेर दगडांवर क्लायम्बिंग करायला ही मंडळी जातात. मागच्या विकेंडला रॉक क्लायम्बिंग हा आमच्याकडे एक फॅमिली इव्हेंटचं झाला. या दोघांच बघून मला ही स्फुरण आलं आणि मी जवळ जवळ दोन वर्षांनी रॉक क्लायम्बिंग केलं. या आधी मी एक दोनदाच बाहेर आणि दोन तीन वेळा जिम मध्ये क्लायम्बिंग केलं होतं . मागच्या वर्षी स्की करताना पडल्यावर माझ्या ऍक्टिव्हिटीजवर बराच निर्बंध आला होता. या वर्षी मात्र मी नियमित व्यायाम करून माझा पाय पूर्ववत करायाचा चंग बांधला आहे. आत्तापर्यंत थोडे सोपे - अवघड हाईक्स करून झाले आहेत पण या रॉक क्लायम्बिंगने मला माझ्या बर्या होत असलेल्या पायाची परीक्षा घेता आली आणि आपले प्रयत्न योग्य मार्गावर आहेत ते बघून छान वाटलं.
ही इनडोअर आणि आऊट्डोअर क्लायम्बींगची एक झलक, फोटो कॅमेरा फोनने काढल्यामुळे क्वालिटी एवढी चांगली नाहिये.
जीम मधे निळ्या शर्ट्मधे मी आणि बा़जुच्या फोटोत लेक
आऊटडोअर रेड रीव्हर गॉर्ज - केंट्की, युएस ( २०१२) आणि दुसर्या फोटोत - Skwamish, कॅनडा ( २०१९)
आऊटडोअर लेक