लेक पुण्यात रहायला गेला आणि मी अगदीच सैरभैर झाले, कितीही रेसिपीज केल्या तरी वाटे हा इथे नाही तर फोटो बघून वाईट वाटेल त्याला मग ते बंद झालं..
वेळ जायला काय करावं सुचेना.. मग परत एकदा गुगलवर शोधाशोध सुरू केली आणि सोप्प्या गोष्टी करायचं ठरवलं.
घरातल्या काचेच्या, मातीच्या बाटल्या सजवायला सुरुवात केली.
क्रोशाचे विणकाम सुरू केले.
आता तोही पुण्यात रमला आणि मी माझ्या या उद्योगात...