या वेळी अॅनिव्हरसरीला जास्त रजा मिळणार नव्हती, म्हणुन तीन-चार दिवसच जवळच कुठेतरी जायचं ठरलं.
ऑस्ट्रीयात साल्झबुर्गजवळ एक फिल्झमुझ नावाच अगदी छोटसं गाव आहे.
फिल्झमुझ हे मेनली हिवाळ्यात स्किइंगसाठी प्रसिद्ध आहे, पण ते आत्ता उन्हाळ्यातसुद्धा खुप मस्त दिसतं.
तिथुन परत म्युनिकला येताना क्यॉनिग त्सेला जायच ठरवल होतं.
जर्मनीला आल्यापासुन मी कायम क्यॉनिग त्सेच्या सुंदरतेबद्दल ऐकत होते, पण अजुन तिथे जाण्याचा योग आला नव्हता.
आता येता येता हे लेक तसं वाटेतच होतं, थोडीशी वाकडी वाट करावी लागणार होती पण क्यॉनिग त्सेसाठी काय पण.
आम्ही साधारण सव्वा अकरा-साडे अकरापर्यंत पोचलो.बोट राइड करण्यासाठी टिकिट काढायला गेलो पण जाउन बघतो तर तिकिट काढायला भली मोठी लाइन होती. अर्धा तास लायनीत थांबल्यावर शेवटी टिकिट मिळालं, पण मिळालं ते एक वाजताच्या बोटीचं.
ही एक तासाची बोट राइड माझ्या आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या लेकच्या बोट राइडपेक्षा सगळ्यात सुंदर राइड होती.
हे लेक म्हणजे अक्षरशः आल्प्सच्या कोंदणात असलेला पाचुच.
मला फार लिहिता येत नाही म्हणुन आता फक्त फोटो टाकते.
क्यॉनिग त्सेच्या शेवटच्या स्टॉपला पोचल्यानंतर साधारण पंधरा मिनिट चालल्यावर ओबर त्से नावाच छोटसं तळं आहे.
ते अजुनच सुंदर आहे. त्या तळ्यातलं पाण्यात शेजारच्या डोंगराचे प्रतिबिंब पडतं, अगदी आरसा असल्यासारखं.