नमस्कार मैत्रिणींनो!
आपल्या सर्वांच्या आवडत्या श्रीगणरायाच्या आगमनाची तयारी जोरात चालू असेल ना?
तयारी करून दमला असाल तर हा घ्या श्रमपरिहार!
लहानपणी कसं रंगीत खडू घेऊन, मन हरपून चित्रं रंगवायचो आपण? तसेच आताही करूया! तुम्हाला आवडणारे कुठलेही रंगाचे माध्यम घ्या अन खालील गणपतीबाप्पाचे चित्र रंगवून ह्या धाग्याच्या प्रतिसादात द्या!
ही स्पर्धा नव्हे!
त्याचबरोबर ह्यासाठी कुठलीही अट देखील नाही. तुम्ही कधी हातात खडू धरला नसेल तर उत्तमच! गणरायाच्या साक्षीने पहिले पाऊल टाका! तुम्ही तुमच्या मुलांना, आईबाबांना, नवरा, मित्रमंडळाला, अगदी एखाद्या १.५-२ वर्षाच्या बाळाला देखील ह्या चित्राची प्रिंट देऊ शकता. त्यांनी रंगवलेले चित्र इथे पोस्ट करा. [गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत केव्हाही पोस्ट करू शकता!]
एकच चित्र पण कितीतरी आविष्कार आपल्याला पाहण्यास मिळतील! खडू, पेन्सिल्स, मार्कर्स, वॉटरकलर्स, पेस्टल्स,क्रोशे, रंगीत मणी, तारा, क्विलिंग कुठलेही माध्यम वापरा.[ इथे नमूद केलेल्या व्यतिरिक्त असेल तरीही चालेल!] शेडींग, ब्लेन्डींग करायचे असेल तर करा! गणपतीबाप्पाला अजुन सजवायचे असेल तर सजवा!
उघडा मग रंगपेटी/क्राफ्टचा बॉक्स!
हे चित्रः
From Ganeshotsav 2015 |