दोन महिन्यांच्या भारतवारीत ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये काढलेले काही फोटो. या फोटोंवर सकारण, अकारण, रास्त, बिनबुडाची, छायाचित्रणाचं कौशल्य किंवा त्याचा अभाव अशा प्रकारची टीकाटिप्पणीसुद्धा अपेक्षित आहे. फक्त 'चान चान' म्हणायलाही ना नाही. (मोठ्या फोटोंसाठी फोटोंवर क्लिक करावे.)
१. ठाण्याच्या घरातून बरेच दिवस सूर्योदय बघत होते. (सकाळी लवकर उठण्याची जाहिरात.) त्याचं काय करायचं, हे समजत नव्हतं. आणि मग एक दिवस काढला एकदाचा फोटो.
२. भारतात जाण्याआधी काही दिवस लॅक्मामध्ये गेले होते. तिथल्या ह्या चित्राचा थोडा प्रभाव पडला. त्यातून घरबसल्या अशी गंमत दिसल्यावर राहवलं नाही -
३. लोकल ट्रेन आणि लोकल स्त्रिया
४. We serve peace. कुर्ला भागात एसी बसमधून प्रवास करताना हे दिसलं.