स्वनिर्मित वायर ज्वेलरी - ट्री ऑफ लाईफ

प्राचीन काळापासून दागिने बनवताना हिरे आणि इतर प्रेषियस जेमस्टोन्स शरीरावर धारण करण्यासाठी प्रेषियस आणि नॉन प्रेषियस धातूंचे पत्रे आणि तारा वापरल्या गेल्या. भारतात आपल्याकडे फक्त धातूच्या तारा वापरल्या जाण्याचा प्रमाण कमी असलं तरी आपल्यालाही ते नवीन नाही (गळ्यात घालायच्या चेन्स बनतात की आपल्याकडे) आणि जगालाही ते नवीन नाही.

दागिने बनताना स्टोन्स आणि तारा नुसत्याच वेड्यावाकड्या वापरण्यापेक्षा निसर्गातले आकार उकार बनवले गेले. काही ठराविक आकार ठसठशीत पणे रेग्युलरली वापरले गेले. आजच्या काळातही ते आकार वापरले जातात. चंद्र सूर्य देवदेवतांचे चेहरे, त्यांची आयुधं, हे आपल्याकडे कॉमनली वापरले गेलेले आकार. पाश्चिमात्य जगात वापरलेले अशातलेच काही आकार म्हणजे कॉइल्स, बायबल मधील tree of life, सेलटिक नॉट आणि सूर्य चंद्र इत्यादी इत्यादी...

माझ्या एका मैत्रिणीने दिवाळीत तिच्या मैत्रणींना देण्यासाठी वायरवर्क मधली खास पेंडन्टस बनवून द्यायला सांगितली. आणि कोणाला काय आवडेल आणि सगळ्या पेंडंट्स ची थीम कॉमन कशी असेल हाविचार करता करता आम्ही वृक्ष प्रेम ह्या कॉमन गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यातून साकारलेले हे पेंडंट्स

PicsArt_10-07-04.39.05.jpg

PicsArt_10-07-04.41.25.jpg

PicsArt_10-07-04.43.10.jpg

PicsArt_10-07-04.23.22.jpg

PicsArt_10-07-04.25.05.jpg

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle