गेल्या वर्षी म्हणजे २०१८ चे अॅनिव्हर्सरी कलेक्शन होते म्हादेई कलेक्शन - १.
नदी वाहते निमित्ताने बर्याच नद्या फिरून झाल्या होत्या. नद्यांशी नाते जुळले होते. गोव्यातल्या म्हादेईशी तर विशेष. नदी वाहतेचे शूट संपवून आल्यापासून नद्यांना तारेत पकडण्यासाठी स्केचिंग आणि प्रयोग चालू होते. पण कलेक्शन करता यावे याचा कॉन्फिडन्स येत नव्हता. तो अखेर गेल्या वर्षी आला. गेल्या वर्षीच्या एप्रिलमधे म्हादेई कलेक्शन किंवा म्हादेई सिरीजचे १२ नेकलेसेस बनवले. वेळेचे बरेच गोंधळ होते त्यामुळे केलेल्या स्केचेसपैकी १२ च बनवता आले. बाकीची स्केचेस आणि इतर काही कल्पना वाट बघत पडून आहेत. येत्या अॅनिव्हर्सरीला त्यातले काही पूर्ण व्हावे असा प्रयत्न आहे.
ही सिरीज केली तेव्हा मी काही काळ मैत्रिणपासून दूर होते. त्यामुळे हे कलेक्शन मैत्रिणवर दाखवलेच नाहीये मी असे अचानक आज लक्षात आले. मग त्यासाठी हा नवीन धागा काढतेय.
हे नेकलेसेस वेअरेबल आर्ट या प्रकारातले जास्त आहेत. नेहमीच्या दागिन्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. यातल्या बर्याचश्या डिझाइन्सच्या रेप्लिका ऑर्डर्स बनवून दिल्या आहेत. त्यातलीही काही चित्रे कलेक्शनमधल्या १२ डिझाइन्सनंतर टाकली आहेत इथे.
म्हादेई सिरीज अजूनही चालू आहेच.
N 33
धबधबा आणि खाली तळे.
N 34
नुसताच धबधबा
N 35
कड्यावरून नदी उडी घेते
N 36
नदी संथ वाहते.
N 37
पायर्या पायर्यांनी नदी खाली उडी घेते.
N 38
संगम - शांत आणि संथ.
N 39
संगम - खळाळता
N 40
दोन काठ मधे नदी
N 41
पायर्यापायर्यांनी नदी खाली उडी घेते.
N 42
धबधबा व तळे
N 43
प्रवाह लयदार आणि वळणदार
N 44
प्रवाह.. भूगोल जन्म देईल तसा..
हे कलेक्शन होते. यातल्या ३४ वर बेस्ड कस्टम ऑर्डर डिझाइनची चित्रे तुम्ही माझ्या दागिने स्वनिर्मित वर पाह्यली आहेत.
ही बाकीची.
३७ ची कस्टम ऑर्डर
४१ ची क ऑ
४३ ची क ऑ
४४ या डिझाइनवर आधारित पण रेप्लिका नाही अशी क ऑ. ४४ ज्या मॉडेलने घातले आहे फोटोशूटसाठी. तिच्यासाठीच बनवलेय.